पुणे( भवानी पेठ) : महापालिकेच्या सोनावणे हॉस्पिटल अंतर्गत विविध प्रकारच्या विकास कामासाठी व अत्यावश्यक मशीनरीसाठी निधी कमी पडू दिला जाणार नसल्याचे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी सांगितले. प्रभाग क्र. 19 अंतर्गत सोनावणे हॉस्पिटल भवानी पेठ या ठिकाणी नव्याने सुरु करण्यात आलेल्या कै. शांताबाई आनंदराव बागवे डायल्यासिस सेंटरचे उदघाटन अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती, उपआरोग्य प्रमुख डॉ. संजय वावरे, रुबी हॉल क्लीनिकचे सर्जन डॉ. आनंद काटकर, महापालिकेतील जेष्ठ नगरसेवक अजित दरेकर, सोनावणे हॉस्पिटल प्रमुख डॉ. रोकडे व कार्यक्रमाचे मुख्य संयोजक नगरसेवक अविनाश बागवे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला पूर्वीचे सोनावणे हॉस्पिटल व आत्ताचे सोनावणे हॉस्पिटल यामध्ये जो आमूलाग्र बदल विकास रूपाने झाला आहे. आणि या पुढील काळातही गोरगरीब कष्टकरी बहुजन समाजातील नागरिकाना या हॉस्पिटल मधून अत्यंत चांगल्या प्रकारच्या सोइ -सुविधा दिल्या जातील. त्यासाठी आम्ही या पुढील काळातही जनतेच्या हितासाठी सातत्याने काम करणार असल्याचे नमूद करून पुणे मनपाच्या वतीने मोठ्या प्रमाणात सेवक वर्ग व अत्यावश्यक मशीनरी व इतर साहित्यासाठी निधी लागणार असल्याची मागणी नगरसेवक बागवे यांनी केली.
त्यानंतर बोलताना अग्रवाल म्हणाल्या की, कोरोनाचा परिणाम प्रभाव शहरामध्ये कमी झालेला असून जे पॉझिटीव्ह रुग्ण आहेत त्यांना रूग्णालय मध्ये उपचार सुरु आहेत. सोनावणे हॉस्पिटल हे पुणे मनपाचे एकमेव प्रसूतीगृह कोरोना काळात सुरु होते. व या हॉस्पिटल मधील सर्व सेवकांनी अत्यंत चांगल्या पद्धतीचे काम केले असल्याचे स्पष्ट केले. या हॉस्पिटलसाठी पुढील काळात जी आर्थिक मदत लागेल ती पुणे मनपाच्या वतीने दिली जाईल असे आश्वासन त्यांनी दिले.
साबीर शेख, रवी पाटोळे, मीरा शिंदे, सुनील घाडगे, सुमित डांगी, क्लेमेंट लाजरस, सुरेखा खंडाळे, व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अरुण गायकवाड, दयानंद अडागळे, हुसेन शेख, सुनील बावकर, रोहित अवचिते, मारुती कसबे, संजय साठे, यावेळी उपस्थित होते.