रेडा (प्रतिनिधी) – इंदापूर तालुक्यातील दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाचे असलेले 25 रस्ते व 10 पूल बांधण्यासाठी राज्यशासनाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून 264 कोटी 71 लाखांचा निधी मंजूर केल्याची माहिती राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
भरणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून राज्याच्या अर्थसंकल्पात इंदापूर तालुक्यासाठी लक्षणीय आर्थिक तरतूद करून घेतली आहे. हॅप्पी इंडिया कंपनी ते गोसावीवाडी ते विठ्ठलवाडी रस्ता, लासुर्णे ते चिखली रस्ता, अंथुर्णे ते भरणेवाडी ते बिरंगुडवाडी, कळस ते राष्ट्रीय महामार्ग रस्ता, निंबोडी ते शेटफळगढे ते लाकडी, मदनवाडी ते ते निरगुडे रस्ता, तावशी ते उद्धट ते थोरातवाडी, सराफवाडी ते निरवांगी ते खोरोची ते पिठेवाडी, न्हावी ते लोणीदेवकर, काटी ते रेडणी रस्ता या रस्त्यासाठी निधी मंजूर केला आहे.
काटीगाव ते नीरा भीमा रस्ता, शिरसोडी ते कालठण नं.2 ते गलांडवाडी रस्ता, रेडणी ते चाकाटी रस्ता, गडदेवाडी ते कौठळी रस्ता, इंदापूर ते शहा रस्ता, लोणी ते चांडगाव रस्ता ,पळसदेव वरकुटे ते कालठण नं. 1 रस्ता, वरकुटे खुर्द ते वडापुरी ते गलांडवाडी 2 ते सरडेवाडी, अगोती नं.1 ते चांडगाव रस्ता, तरंगवाडी ते गोखळी रस्ता, आडोबावस्ती ते नरसिंहपूर रस्ता, लाखेवाडी ते पीठेवाडी ते सराटी ते गणेशवाडी रस्ता व कौठळी ते कर्मयोगी कारखाना ते इंदापूर रस्ता होणार आहे. आशियाई विकास बॅंक योजनेंतर्गत बारामती भिगवण रस्त्यासाठी 47 कोटी 32 लाख व खडकी, पारवडी, शेटफळगढे ते भवानीनगर रस्त्यासाठी 69 कोटी 13 लाखांचा वाढीव निधी मंजूर झाला आहे.
कळस ते लोणी पूल, बाभूळगाव ते भांडगाव, सराफवाडी ते रेडा, शिरसोडी ते भांडगाव, सराफवाडी ते पिठेवाडी, तरंगवाडी ते गोखळी, पिंपरी ते नरुटेवाडी, वडापुरी रेडणी (1 कोटी), वरकुटे खुर्द ते गलांडवाडी 2 तर शेळगाव ते व्याहाळी पुलांची कामे होणार आहेत.
नीरा पूल बांधण्याच्या कामासाठी लागणारे भूसंपादन करण्यासाठी 1 कोटी 30 लाख तर लासुर्णे येथे विश्रामगृह बांधण्यासाठी 2 कोटी 60 लाखांचा निधी मंजूर झाला आहे.