फंड मॅनेजर्सची पसंती खासगी बँकांना

जुलै महिन्यात म्युच्युअल फंड व्यवस्थापकांनी खासगी क्षेत्रातील बँकांच्या शेअर खरेदीवर जोर दिल्याचे दिसत आहे. विविध म्युच्युअल फंड योजनांच्या व्यवस्थापकांनी अक्सिस बँकेचे 2,145 कोटी रुपयांचे शेअर जुलै महिन्यात खरेदी केले. त्याखालोखाल आयसीआयसीआय बँकेचे 1,863 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी म्युच्युअल फंडांकडून झाली.

नैसर्गिक वायू प्रक्रिया आणि वितरण क्षेत्रातील सरकारी मालकीच्या गेल कंपनीच्या शेअरची 1,251 कोटी रुपयांची खरेदी झाली. एचडीएफसी बँकेला म्युच्युअल फंड व्यवस्थापकांची कायम पसंती असते. जुलै महिन्यातही त्यांच्याकडून एचडीएफसी बँकेचे 1,179 कोटी रुपयांचे शेअर खरेदी करण्यात आले. आयटीसीचे 1,056 कोटी रुपये आणि एल अँड टीचे 1,051 रुपयांच्या शेअरची खरेदी जुलै महिन्यात म्युच्युअल फंडांकडून झाली.

त्यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, एनटीपीसी, टायटन, कोल इंडिया, बजाज फायनान्स या कंपन्यांना म्युच्युअल फंड मॅनेजर्सकडून पसंती होती.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×