गोव्यात आमदारासह पूर्ण कुटुंब करोना पॉझिटिव्ह

पणजी (प्रतिनिधी): गोव्यातील भाजप आमदारासह त्यांचे पूर्ण कुटुंब करोना पॉझिटिव्ह असल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले आहे.

दक्षिण गोव्यातील कुंकळ्ळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार हे मंगळवारी पॉझिटिव्ह आढळून आले होते. त्यानंतर आज गुरुवारी त्यांची पत्नी व दोन्ही मुलांचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे.

गोव्यात आमदार व त्याचे कुटुंबीय कोविडग्रस्त आढळण्याची ही पहिलीच वेळ आहे. दरम्यान, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना आठ दिवसांपूर्वी दहा आमदार भेटले होते. त्यात या आमदारांचा सहभाग होता.

Leave A Reply

Your email address will not be published.