फुलहॅमच्या विजयात ब्रायनचे वर्चस्व

Madhuvan

लंडन –जो ब्रायन याने केलेल्या अफालातून गोलच्या जोरावर इंग्लिश प्रीमिअर लीगच्या पात्रतेचा निकष असलेल्या चॅम्पियनशिप प्ले-ऑफ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात फुलहॅमने ब्रेंटफोर्ड संघाचा 2-1 असा पराभव केला विजेतेपदावर शिक्‍कामोर्तब केले.

या विजयाच्या जोरावर फुलहॅमने आगामी इंग्लिश प्रीमिअर लीगमध्ये पात्र ठरण्याची कामगिरी केली. निर्धारित वेळेत हा सामना गोलशून्य बरोबरीत सुटल्याने अतिरिक्‍त वेळेत सामना गेला. त्यात ब्रायनने दोन गोल केले. सामन्याच्या 105 व्या मिनिटाला ब्रायनने फ्री किकवर जवळपास 35 यार्डावरून अफलातून गोल केला व संघाला आघाडी मिळवून दिली. यानंतरही ब्रायनने सहकारी खेळाडूंसह अप्रतिम पासेस करत 117 व्या मिनिटाला आणखी एक अविश्‍वसनीय गोल केला व संघाची आघाडी 2-0 अशी वाढवली.
यावेळी ब्रेंटफोर्ड संघानेही आक्रमण केले व लगेचच फुलहॅमचा बचाव भेदत गोल केला. मात्र, त्यानंतर काही वेळातच सामन्याची वेळ संपली व फुलहॅमचे विजेतेपद निश्‍चित झाले. या विजयाच्या जोरावर फुलहॅमने जगातील सर्वात श्रीमंत फुटबॉल लीग असलेल्या इंग्लिश प्रीमिअर लीगमध्येही पात्र ठरण्याची कामगिरी केली. या स्पर्धेच्या सर्वात अव्वल गटात आता फुलहॅमचा संघ दाखल झाला आहे. करोनाचा धोका असल्याने या स्पर्धेसाठी प्रेक्षकांना मैदानावर उपस्थित राहण्याची परवानगी नव्हती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.