दारू विक्रीप्रकरणी फरारी गजाआड

शिरवळ – शिरवळ परिसरात चौपाळा येथील कॅनॉललगत बेकायदा दारू विक्रीप्रकरणी दोन वर्षांपासून फरार असलेल्या दारूविक्रेत्याला शिरवळ पोलिसांनी गजाआड केले. सुशील शैलेंद्र निरंकारी (वय 34 रा. गांधीनगर, कोल्हापूर, सध्या रा. शिरवळ ता. खंडाळा) असे संशयिताचे नाव आहे. याबाबतची शिरवळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शिरवळ, ता. खंडाळा येथील चौपाळा येथील महामार्गालगत बेकायदेशीररीत्या सुशील निरंकारी हा दारूविक्री करत असल्याची माहिती शिरवळ पोलिसांना मिळाल्यानंतर शिरवळ पोलीसांनी 12 ऑक्‍टोबर 2017 रोजी सायंकाळी संबंधित ठिकाणी छापा टाकला होता. त्यानुसार शिरवळ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.

यावेळी सुशिल निरंकारी याने खंडाळा येथील न्यायालयामध्ये योग्य जामीन देणे आवश्‍यक होते. मात्र तो जामीन न देता गेल्या दोन वर्षांपासून फरारी झाला होता. यावेळी सातारा पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते, फलटण पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. अभिजित पाटील यांच्या आदेशानुसार शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनायक वेताळ, पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र कदम, इब्राहिम शेख, हवालदार विकास इंगवले, गोपीनाथ कोल्हे यांच्या पथकाने अथक सुशिल निरंकारी याला गजाआड केले. खंडाळा येथील न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या घटनेची नोंद शिरवळ पोलीस स्टेशनला झाली असून तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग हजारे हे करीत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.