फरार मोबाईल चोरट्यास अटक, 18 मोबाईल जप्त

सातारा – पोलिसांना दोन वर्षांपासून गुंगारा देणाऱ्या मोबाईल चोरट्यास पकडण्यात शाहूपुरी पोलिसांना यश आले. नितेश संतोष शिखरे (रा. गडकर आळी, सातारा) असे संशयीताचे नाव आहे. नितेश हा चोरीचे मोबाईल घेवून विक्रीसाठी सातारा शहरातील जुना मोटार स्टॅन्ड येथे येणार असल्याची माहिती शाहूपुरी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल शेलार यांच्या पथकाने सापळा लावला होता.

त्यावेळी शिखरे जुना मोटार स्टॅन्ड परिसरात शिखरे हातात पिशवी घेवून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतला. त्याने सातारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली. पोलीसांना त्याच्याकडे 28 हजार किमंतीचे 18 मोबाईल पोलिसांना मिळाले. ही कारवाई पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल शेलार, पोलीस उपनिरीक्षक भैरीनाथ कांबळे, हवालदार अधिक खरमाटे, अमित माने, लैलेश फडतरे, स्वप्नील कुंभार यांनी केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.