शिवसेना नेत्याच्या हत्येच्या आरोपातील फरारी आरोपीस सहा वर्षांनी अटक

ठाणे, – ठाणे जिल्ह्यातील स्थानिक शिवसेना नेत्याच्या हत्या प्रकरणात गेल्या सहा वर्षापासून फरारी झालेल्या आरोपीला अटक करण्यात ठाणे क्राईम ब्रॅंचच्या अधिकाऱ्यांना यश आले आहे.

सागर कांबळे असे या आरोपीचे नाव आहे. तर केशव मोहिते असे शिवसेनेच्या स्थानिक नेत्याचे नाव आहे. ते शिवसेनेच्या बदलापुर शाखेचे उपशाखाप्रमुख होते. त्यांची 4 एप्रिल 2015 रोजी हत्या झाली होती. या प्रकरणात पोलिसांनी चार जणांना अटक केली होती. पण यातील सागर कांबळे मात्र सहा वर्षांपासून फरारी होता.

हा आरोपी कोल्हापुर जिल्ह्यातील उचगावांत लपून बसल्याची माहिती क्राईम ब्रॅंचच्या अधिकाऱ्यांना समजली त्यांनी तेथे जाऊन सागरच्या मुसक्‍या आवळल्या. त्याला पुढील तपासासाठी बदलापुर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.