जळोची – बारामती शहरातील मटका व्यावसायिक कृष्णा जाधव यांच्या खूनप्रकरणातील एका फरार आरोपीस सोलापुरात अटक केली. ही घटना (दि 15) नोव्हेंबर 2018 रोजी घडली होती. कृष्णा यांची पत्नी सपना जाधव यांनी बारामती शहर पोलिसांत फिर्याद दिली होती.
यातील 21 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. मोठा बिट्या ऊर्फ सचिन रमेश जाधव (वय 27, रा. टकार कॉलनी, बारामती) फरार होता. बारामती पोलिसांनी सोलापूर येथे त्याला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीस सहा दिवसांची कोठडी सुनावली आहे.