नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्याचे मतदान 11 एप्रिल रोजी होणार आहे. त्यानंतर सात टप्प्यात वेगवेगळ्या ठिकाणी मतदान पार पडणार आहे. या कालावधीत मतदानाच्या दिवशी पेट्रोल-डिझेलवर सूट देण्याची घोषणा ऑल इंडिया पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनने केली आहे.
पेट्रोल-डिझेलवर प्रतिलिटर 50 पैसे सूट मिळणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. मतदारांसाठी ही ऑफर मतदानाच्या दिवशी सकाळी 8 वाजेपासून रात्री 8 वाजेपर्यंत असणार आहे. या योजनेचा फायदा घेण्यासाठी मतदारांना आपल्या बोटावर असलेले मतदानाचे चिन्ह दाखवणे बंधनकारक असेल.
मतदानाचा हक्क बजावल्यानंतर निवडणुकीला लक्षात घेत अनेक सामाजिक संस्थांनी एक पाऊल पुढे उचलताना दिसत आहेत. मतदारांना जागृत करण्यासाठी अनेक उपाययोजना राबवल्या जात आहेत. त्यानुसारच पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनकडून एक घोषणा करण्यात आली आहे.