नवी दिल्ली, दि. 13 – पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज सलग सातव्या दिवशी वाढ नोंदवली गेली. आज पेट्रोलचा दर 59 पैशांनी तर डिझेलचा दर 58 पैशांनी वाढला. या सलग सात दिवसांच्या वाढीने पेट्रोलच्या दरारत 3 रुपये 90 पैसे त डिझेलच्या दरात 4 रुपये प्रति लीटर इतकी वाढ झाली आहे.
कच्चा तेलाच्या किमती कमी होत असताना सरकारने इंधनाच्या किमती गोठवल्या होत्या. म्हणजेच त्या कमी होऊन ग्राहकांना त्याचा लाभ मिळू देण्यात आला होता.
देशात 82 दिवस ही स्थिती होती. त्यानंतर सरकारने 6 मे रोजी पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर तब्बल दहा रुपये आणि डिझेलच्या दरात 13 रुपये इतकी वाढ करून नंतर आता दैनंदिन स्वरूपात कच्चा तेलाच्या भावानुसार इंधनाचे दर बदलण्यास अनुमती दिली आहे. परिणामी हे दर सतत वाढत आहेत. त्यामुळे देशभरातील ग्राहकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.