देशात पुन्हा एकदा इंधन दरवाढीचा भडका

सलग चौथ्या दिवशी देशात इंधनाचे भाव

नवी दिल्ली : जगातील सर्वात मोठी सौदी अरबमधील तेल कंपनी आरमकोवर झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर जगभरात इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खनिज तेलाच्या पुरवठ्यावरही याचा मोठा परिणाम झाला आहे. त्यातच आता देशात सलग चौथ्या दिवशी इंधन दरवाढ झाली आहे. मुंबईत आज सकाळी पेट्रोलच्या दरात 34 पैशांनी वाढ झाली त्यामुळे मुंबईकरांना आता 78.73 रु.प्रतिलिटर घ्यावे लागत आहे. तसेच डिझेलच्या दरातही वाढ झाल्याने प्रतिलिटर 69.53 रु.एवढी वाढ झाली आहे.

जगातील कच्चा तेलाची आणि खनिज तेलाच्या पुरवठ्यामुळे देशात इंधन दरवाढीचा भडका उडत आहे. दरम्यान, दिल्लीकरांनाही आज पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीने दिवसाची सुरूवात करावी लागली. त्यामुळे आता दिल्लीत 79.03 आणि डिझेल 69 रुपये प्रतिलिटरने घ्यावे लागत आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×