नवी दिल्ली – पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती सलग दुसऱ्या दिवशी खाली आल्या आहेत. गुरुवारी 25 मार्च रोजी चार महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये 20 पैशांनी बदल करण्यात आले. त्यामुळे मुंबईत पेट्रोल आणि डिझेलचे सुधारित दर अनुक्रमे 97.19 आणि लिटर 88.20आहेत.
व्हॅटमुळे देशांतर्गत पेट्रोल आणि डिझेलचे दर वेगवेगळे असतात. इंधन दरामधील कोणताही बदल दररोज सकाळी 6 वाजेपासून लागू केला जातो.
गेल्या 12 दिवसांत आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत 67 डॉलरवरून 60 डॉलरवर आली आहे. पण त्याचा किरकोळ दरावर होणारा परिणाम अद्याप दिसून आलेला नाही. तसे, केवळ तीन दिवसानंतर पाच राज्यात निवडणुका सुरू होणार आहेत, त्यामुळे देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये आणखी घट होण्याची अपेक्षा आहे.