नवी दिल्ली : देशात पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुका संपल्यापासून इंधन दरात वाढ होण्यास सुरुवात झाल्याचे दिसून येत आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. पेट्रोल 84 तर डिझेल 83 पैशांनी महागणार आहे. आज सकाळी 6 वाजल्यापासून देशात नवे दर लागू झाले आहेत.
काल पेट्रोल प्रतिलीटर 84 पैसे तर डिझेलच्या दरात प्रतिलीटर 83 पैशांनी वाढ करण्यात आली आहे. त्याआधी गेल्या वर्षी 3 नोव्हेंबर 2021 पासून देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झाली नव्हती. युक्रेन-रशिया युद्धामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती 114 डॉलर प्रति बॅरेलवर पोहोचल्या आहेत.
उत्तर प्रदेशसह पाच राज्यातील विधानसभा निवडणूक निकालानंतर पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ होणार शक्यता वर्तवली जात होती, ते अंदाज आता खरे ठरताना दिसत आहेत. शिवाय आगामी काळात पेट्रोल-डिझेलचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. बुधवारी म्हणजेच, किरकोळ बाजारात आज सकाळपासून पेट्रोल 84 तर डिझेल 83 पैसे प्रति लिटरने वाढ झाली आहे. मुंबईत सध्या पेट्रोल 110.82 रुपये प्रति लीटर तर डिझेल 95.00 रुपये प्रति लीटर आहे.
जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती 114 डॉलर प्रति बॅरेलवर पोहचली आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे. मुंबईत सध्या पेट्रोल 109.98 रुपये प्रति लीटर तर डिझेल 94.14 रुपये प्रति लीटर आहे. घाऊक ग्राहकांसाठी डिझेलच्या दरात 25 रुपयांची वाढ झाली आहे.