‘एफटीआयआय’ जगातील “टॉप टेन’ संस्थांमध्ये

यूएससी स्कूल ऑफ सिनेमॅटिक आर्टस अव्वल

पुणे – सीईओ वर्ल्ड मॅगझिनने जगातील उत्कृष्ट 30 चित्रपट संस्थांची यादी प्रसिद्ध केली आहे. त्यात पुण्यातील फिल्म ऍन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) ही संस्था जगातील उत्कृष्ट दहावी चित्रपट संस्था ठरली आहे.

सीईओ वर्ल्ड मॅगझिन जगातील बिझनेस मॅगझिन आहे. यूएससी स्कूल ऑफ सिनेमॅटिक आर्टस या अमेरिकेतील संस्थेला सर्वोत्कृष्ट चित्रपट संस्था म्हणून मान मिळाला आहे. अमेरिकन फिल्म इन्स्टिट्यूट (एएफआय), यूसीएलए स्कूल ऑफ थिएटर फिल्म ऍन्ड टेलिव्हिजन, कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ द आर्टस या अमेरिकेतील संस्थांना एक ते चार क्रमांक मिळाले आहेत. नॅशनल फिल्म ऍन्ड टेलिव्हिजन स्कूल (ब्रिटन) ही संस्था पाचव्या स्थानी आहे. तर न्यूयॉर्क फिल्म अकादमी सहाव्या स्थानावर आहे, तर न्यूयॉर्कच्या एनवाययू टिश स्कूल ऑफ द आर्टसला सातवे स्थान मिळाले आहे. कॅनडा येथील टोरांटो फिल्म स्कूल आठव्या व ऑस्ट्रेलियातील सिडनी फिल्म स्कूलला नववे स्थान मिळाले आहे.

चित्रपट आणि दूरचित्रवाणी माध्यमाचे प्रशिक्षण देण्याबरोबरच भारतीय चित्रपटसृष्टीसाठी दर्जेदार कलाकारांची फळी निर्माण करणारी एफटीआयआय दहाव्या स्थानी असून ती पहिल्या दहामध्ये समाविष्ट झालेली आशियातील एकमेव संस्था ठरली आहे. भारतीय चित्रपटसृष्टीत एफटीआयआयने मोलाचे योगदान दिले आहे.

दरम्यान, “सीईओ वर्ल्ड मॅगझिनने आपणहून हा बहुमान दिला आहे. त्याबद्दल त्यांचे संस्थेच्या वतीने आभार,’ अशी प्रतिक्रिया याबाबत “एफटीआयआय’चे संचालक भूपेंद्र कॅंथोला यांनी आभार मानले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)