शरीराला आतून सशक्त बनवतात फळांचे रस

पुणे – आपले आरोग्य निरोगी राहण्यासाठी आपल्याला नेहमीच्या वापरातील फळे -फळभाज्या, पालेभाज्या, वनौषधींच्या रसाचा चांगलाच उपयोग होतो. फक्त अशा उपयुक्त रसांची आपल्याला माहिती असणे आवश्‍यक असते. त्यात कोणते घटक आणि जीवनसत्वे असतात आणि ते आरोग्याला कसे पूरक ठरतात हे समजावून घेऊन त्यांचा आपल्या आहारात जर समावेश केला तर आपण कायमच निरोगी राहू आणि जगण्यातला खरा आनंद उपभोगू शकू. म्हणूनच आम्ही काही खास फळांच्या रसाहाराविषयी तुम्हाला सांगणार आहोत…

6) कारल्याचा रस – कारल्यामध्ये अ, ब जीवनसत्व व लोह असल्यामुळे कारल्याचा रसे हे अनेक रोगांवर वरदान ठरले आहे. कारले रसामुळे रक्तशुद्धी होते. मूतखडा विरघळण्यास मदत होते. मधुमेहींची शर्करा नियंत्रित होते. मूत्रपिंडाचे विकार बरे होतात. संधिवात आटोक्‍यात येतो. आतड्यांची स्वच्छता होते. काविळीत कारल्याचा रस अवश्‍य प्यावा.

7) लिंबू रस – लिंबू रसात क जीवनसत्व व लोह असते त्यामुळे शरीरशुद्धी होते. लिंबूरसात आम्लता अधिक असल्यामुळे  चांगली भूक लागते. हा रस कफहारक आहे. पचन तक्रारी दूर करतो. घशाचे विकार दूर करतो. आम्लपित्तात उपयुक्त. संधिवात झालेल्यांनी लिंबूरस अवश्‍य प्यावा. मलेरिया, टायफाईड, सर्दी, फ्ल्यू या विकांरामध्ये लिंबूरस शक्ती देते. रक्तवाहिन्यांना मजबूती देणारा एकच रस आहे तो म्हणजे लिंबू रस.

8) सफरचंदाचा रस – सफरचंदामध्ये ब जीवनसत्व असते व लोहक्षार असतात. अपचन, डोकेदुखी, मूतखडा, आम्लपित्त, आतड्याच्या व ओटीपोटाच्या तक्रारींवर सफरचंद उपयुक्त आहे. मज्जासंस्थेची शक्ती वाढविणारा एकमेव रस आहे सफरचंदाचा रस. दमेकऱ्यांनी तर हा रस अवश्‍य प्यावा.

9) अननसाचा रस – या रसामध्ये ब जीवनसत्व अधिक असते. क्‍लोरिन असल्यामुळे रक्तशुद्धी आणि आतड्यांमधील जंतूंचा नाश होतो. हृदयाचे कार्य नीट चालण्यासाठी व मूत्रपिंडाचे कार्य योग्य प्रकारे होण्यासाठी उपयुक्त आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.