…तर पंतप्रधान मोदींसमोर आत्महत्या करेल – भाजप उमेदवार

नवी दिल्ली – एकीकडे मोदी सरकार नागरिकता संशोधन विधेयक पारित करण्याचा दावा करत आहे तर दुसरीकडे भाजपमध्येच या विधेयकावरून नाराजीचे सूर उमटत आहेत. शिलॉंग उमेदवाराने या नागरिकता संशोधन विधेयकाला तीव्र विरोध केला असून झाल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर आत्महत्या करेल, अशी धमकीच दिली आहे.

शिलॉंगचे भाजप उमेदवार सनबोर शुल्लई यांनी म्हंटले कि, मी जिवंत असेपर्यंत नागरिकता संशोधन विधेयक लागू होऊन देणार नाही. मी पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर आत्महत्या करेल, असे त्यांनी सांगितले आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी आसाममध्ये झालेल्या प्रचारसभेत नरेंद्र मोदींनी म्हंटले कि, नागरिकता संशोधन विधेयकासंबंधी चुकीची माहिती पसरवली जात आहे. विरोधी पक्ष जनतेची दिशाभूल करत आहेत. आसमसह देशात कोणत्याही हिस्सात घुसखोऱ्यांसाठी कोणतीही जागा नाही, असे त्यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.