देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्ड कार्यालयावर मोर्चा

…अशा आहेत मागण्या

करपात्र असणाऱ्या मतदारांची नावे वगळू नये, हरकती नोंदविण्यास मुदत वाढ द्यावे. नवीन शौचालय बांधण्यात यावे, बाजारपेठेतील स्वच्छतागृह दुरुस्त करावे, इंदिरानगर येथे नळजोड द्यावे अनधिकृत नळजोड अधिकृत करावे, गांधीनगर, डॉ. आंबेडकर नगर, पारशी चाळ, शितळानगर नं. 1 येथे बालकासाठी खेळणी आदी.

देहूरोड – करपात्र असणाऱ्या मतदारांची नावे वगळू नये, हरकती नोंदविण्यास मुदत वाढ द्यावे यासह सुमारे अकरा प्रमुख मागण्यांसाठी देहुरोड विकास समितीने बुधवारी देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्ड कार्यालयावर बुधवारी मोर्चा काढला. मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरूप हरितवाल यांनी निवेदन स्वीकारले.

कॅंटोन्मेंट बोर्डाने एक जुलै रोजी शासकीय जमिनीवर वास्तव्यास असणाऱ्या मतदारांची नावे मतदार यादीतून वगळल्यानंतर देहुरोड विकास समितीचे अध्यक्ष पास्टर सोलोमनराज भंडारे, सचिव राजु मारीमुत्तू, परशुराम तेलगू यांनी पं. जवाहरलाल नेहरू मंगल कार्यालय येथून बाजार पेठ, भाजी मंडईमार्गे बोर्ड कार्यालयावर मोर्चा काढला. बोर्डाचे माजी उपाध्यक्ष अमिन शेख, परशुराम दोडमणी, बॉबी डिक्‍का, अब्राहम भंडारे, पी ऍडम, दिपक चौगुले, पंकज तंतरपाळे यासह मतदार यादीतील नावे वगळलेली अनेक मतदार मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चा बाजारपेठ, भाजी मंडईमार्गे कार्यालयावर आल्यानंतर समितीच्या शिष्टमंडळाने बोर्डाचे सीईओ हरितवाल यांना मागण्यांचे निवेदन स्वीकारले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.