श्रीनगर : भारतीय क्रिकेट संघा माजी कर्णधार आणि लेफ्टनंट कर्नल महेंद्रसिंह धोनी याने नुकताच वेस्ट इंडिज दौऱ्यातून माघार घेतली होती. त्यानंतर त्याने काश्मीरमध्ये लष्करासोबत सीमेवर राहण्यासाठी प्रशिक्षण घेणार असल्याचे म्हटले होते. त्याचाच भाग म्हणून धोनीचे मिशन काश्मीर आजपासून सुरू होणार आहे.अर्थात 31 जुलै ते 15 ऑगस्टपर्यंत धोनी काश्मीरच्या सीमारेषेवर प्रशिक्षण घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
महेंद्रसिंह धोनी हा दक्षिण काश्मीरच्या विक्टर फोर्ससोबत प्रशिक्षण घेणार आहे. 106 टेरिटोरिअल आर्मी बटालियन – पॅरा चा भाग असणारा धोनी आपल्या प्रशिक्षण काळात गस्त, गार्ड आणि पोस्ट ड्यूटी करणार आहे. धोनीची पोस्टींग दक्षिण काश्मीरच्या अवंतीपोरामध्ये करण्यात आली आहे. हा भाग मागील काही दिवसांपासून दहशतवाद्यांचे तळ बनला आहे त्यामुळे धोनीची इथली पोस्टींग महत्वाचे मानले जात आहे. दरम्यान, या प्रशिक्षणासाठी धोनीने लष्कराकडे परवानगी मागितली होती त्यानंतर लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी याची परवानगी दिल्यानंतर विक्टर फोर्ससोबत प्रशिक्षण देण्याचे अंतिम झाले. यापुर्वीदेखील धोनीने लष्कराचे प्रशिक्षण घेतले आहे परंतु, हे प्रशिक्षण धोनीसाठी महत्वाचे आणि जास्त दिवसांचे असल्याने सर्वांच्या नजरा त्यांच्याकडे लागल्या आहेत.