नवी दिल्ली – टेक्नोलॉजी विश्वात प्रतिष्टेची समजली जाणारी ‘ॲपल’ कंपनी आपल्या ग्राहकांसाठी “ॲपल टीव्ही प्लस” ही नवीन सर्व्हिस घेऊन आली आहे. ही एक टीव्ही आणि फिल्म स्ट्रीमिंग सर्व्हिस असून, यावर उपलब्ध असलेला कंटेन्ट दुसरीकडे कुठे उपलब्ध असणार नाही.
ही सेवा आज (1 नोव्हेंबर) पासून सुरु करण्यात आली आहे. आयफोन, आयपॅड, ॲपल टीव्ही आणि मॅकवरील टीव्ही अॅप यासारख्या अन्य डिव्हाइस मध्ये ही सर्व्हिस उपलब्ध असणार आहे. त्यामुळे ॲपल युजर्ससाठी ही एक आनंदाची बाब असणार आहे.