वेळ अमावस्या निमित्ताने आमदार शेतात

उस्मानाबाद : मराठवाड्यामध्ये दर्शवेळ अमावस्या हा सण महत्वाचा आणि शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा मानला जातो. राजकीय नेत्यांनाही या सणाचे कौतुक असते. स्वर्गीय विलासराव देशमुख यांच  वेळ अमावस्येचे वेगळेच नात अवघ्या महाराष्ट्राने पाहिले आहे.

सगळेच राजकीय नेते आजच्या दिवशी आपल्या शेतामध्ये आवर्जुन हजेरी लावतात. यंदा त्यामध्ये कैलास पाटील या शेतकरी कुटुंबाची पार्श्वभुमी असलेल्या आमदाराची भर पडल्याचे दिसुन येत आहे.

स्वतः शेती करत शेतीत तरुणांना रोजगार मिळवुन देत त्यांची राजकीय वाटचाल सूरु झालेली आहे. त्यामुळे त्यांच्या राजकारणाचा पाया हा शेती असल्याचे ते कायम सांगतात.

कैलास पाटील यांचा या सणाशी अत्यंत जवळचा सबंध आहे. एक दिवस अगोदरच मुंबईतील सर्व काम आटोपुन त्यानी आपले गाव गाठले. आमदार  पाटील येणार असल्याचे समजतास जवळच्या गावातील शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात गर्दी केली.

 

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.