रेल्वे स्टेशन ते बॉलिवूडमध्ये; रानू मंडलची दमदार एंट्री 

पश्चिम बंगालधील राणावत रेल्वे स्टेशनवर लता मंगेशकर यांचा आवाजातील गाणे गाणारी रानू मंडल या महिलेचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी चांगलाच व्हायरल झाला होता. रानू मंडलच्या या व्हिडीओने तिला एका रात्रीत सुपरस्टार बनविले. तिच्या या आवाजाला आता ऑफिशियल ओळख मिळाली आहे. हिमेश रेशमियाच्या  ‘हैप्पी हार्डी एंड हीर’ या चित्रपटात गाणे गाणार आहे.

हिमेश रेशमियाने इंस्टाग्राम अकाउंटवर रानू मंडलचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये रानू मंडल ‘तेरी मेरी कहानी…’ गाणे रिकॉर्ड करताना दिसत आहे. हिमेश रेशमियाने पोस्टला कॅप्शन देताना म्हंटले कि, तुमची सर्व स्वप्न सत्यात उतरू शकतात. जर आपण त्यांना पूर्ण करण्याची हिम्मत ठेवतो. एक सकारात्मक विचार तुमचे स्वप्न पूर्ण करू शकते. तुमच्या सर्वांच्या प्रेम आणि समर्थनासाठी धन्यवाद. हिमेश रेशमियाच्या या कृत्याची नेटकऱ्यांनी स्तुती केली आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×