TOP 10 News : 1. संसाराची स्वप्ने अधुरीच! १० दिवसांपूर्वी लग्न झालेल्या नवदाम्पत्याचा अंत एका नवविवाहित जोडप्याचा भीषण अपघातात मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना सातारा जिल्ह्यात घडली आहे. पाटणमधील सडादाढोली गावातील राजू झोरे (२५) आणि राणी झोरे (२३) यांचे लग्न फक्त १० दिवसांपूर्वीच झाले होते. सोमवारी दुपारी ते आपल्या दुचाकीवरून एका नातेवाईकाच्या लग्नाला चालले होते. त्याचदरम्यान कराड-चिपळूण रस्त्यावर एका ट्रकला ओलांडून पुढे जात असताना समोरून येणाऱ्या पिकअप गाडीने त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, पती राजू यांचा जागीच मृत्यू झाला. तर पत्नी राणी यांना वाचवण्यासाठी दवाखान्यात नेले जात होते, पण वाटेतच त्यांचीही प्राणज्योत मालवली. ज्या घरात लग्नाचा आनंद होता, तिथे आता फक्त आक्रोश उरला आहे. पोलिसांनी पिकअप चालकावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. (TOP 10 News) Satara News 2. सरकारी कर्मचारी, शिक्षक आजपासून बेमुदत संपावर राज्यातील सरकारी कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी असे मिळून सुमारे १७ लाख कर्मचारी प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी मंगळवारपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. रुग्णालयातील कर्मचारीही संपात सहभागी होणार असल्याने रुग्णसेवेवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. कर्मचाऱ्यांच्या मागण्या कोणत्या तर, राज्य शासनाच्या वतीने सन २०२४ मध्ये जाहीर करण्यात आलेल्या सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतनासंदर्भात नियम व कार्यपद्धती, तसेच अटी व शर्ती विशद करणारी अधिसूचना काढावी, निवृत्तीचे वय ५८ वरून ६० वर्षे करावे, सर्वसमावेशक आरोग्य विमा योजना आणि चतुर्थश्रेणी व वाहनचालकांच्या पदभरतीस १०० टक्के बंदी लादण्यात आली असल्याने या अव्यवहार्य निर्णयाचा फेरविचार करावा. तर दुसरीकडे, राज्य सरकारने संप बेकायदेशीर ठरवत संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला आहे.TOP 10 News 3. साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने आज राज्यातील वरिष्ठ भारतीय पोलीस सेवा अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले आहेत. पुण्याचे पोलीस उप आयुक्त निखिल पिंगळे यांची बदली सातारा पोलीस अधीक्षकपदी करण्यात आली आहे. साताऱ्याचे विद्यमान अधीक्षक तुषार दोशी आता सांगलीचे नवे पोलीस अधीक्षक असतील. सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडी वेळी मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांना धक्काबुक्की झाली होती. त्यानंतर पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांना निलंबित करण्याचे निर्देश उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिले होते. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सक्तीच्या रजेवर पोलीस अधिक्षक तुषार दोशी यांना काही दिवस पाठवल्यानंतर आज अचानक तुषार दोशी यांची बदली सांगलीला करण्यात आली आहे. याशिवाय सांगली, जळगाव, कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यांच्या पोलीस अधीक्षकांमध्ये मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. 4. राज्यातील काही भागात पावसाची शक्यता राज्यातील विविध भागांत 20 ते 24 एप्रिल या कालावधीत गारपीटसह पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार वर्तवण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकण विभागातील जिल्ह्यांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन राज्य आपत्कालीन कार्य केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे. मुंबई, पालघर, रायगड, ठाणे येथील काही भागांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह हलक्या पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे. दुसरीकडे दिवसभर उकाड्याने हैराण झालेल्या परभणी आणि यवतमाळमध्ये रात्री उशिरा अचानक वादळ वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात अवकाळी पावसाने अनेक भागात हजेरी लावली. अचानक बदललेल्या हवामानामुळे सर्वत्र गारवा निर्माण झाला. मात्र यामुळे पिकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. TOP 10 News eknath shinde and bacchu kadu 5. बच्चू कडूंना शिवसेनेकडून विधान परिषदेची ऑफर महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे. अशातच विधानपरिषदेच्या निवडणुकीसंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांची भेट झाली आहे. शिवसेनेकडून बच्चू कडू यांना विधानपरिषदेची ऑफर देण्यात आल्याची माहिती बच्चू कडू यांनी दिली आहे. एकनाथ शिंदे आणि बच्चू कडू यांची दोन दिवसांपूर्वी मुंबईत भेट झाली होती. विधान परिषदेच्या जागे संदर्भात एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा झाली. शिंदे शिवसेनेकडून विधान परिषदेच्या दोन जागा लढवल्या जाणार आहेत. त्यातील एका जागे संदर्भात शिवसेनेकडून आपल्याला ऑफर असल्याची माहिती बच्चू कडू यांनी एका वृत्तवाहिनीला दिली आहे. 6. अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणी अरविंद केजरीवाल यांना उच्च न्यायालयाकडून मोठा झटका बसला आहे. या प्रकरणाच्या सुनावणीपासून स्वत:ला दूर ठेवण्याची विनंती करणारी केजरीवालांची याचिका न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा यांनी सोमवारी फेटाळून लावली. यामुळे आता या प्रकरणाची पुढील सुनावणी त्यांच्याच समोर होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष न्यायालयाने केजरीवाल यांची या प्रकरणातून मुक्तता केली होती, ज्याला सीबीआयने उच्च न्यायालयात आव्हान दिले. न्या. शर्मा यांनी यापूर्वी आपल्याला कोणताही दिलासा दिला नसल्याचा दावा करत केजरीवालांनी त्यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यास आक्षेप घेतला होता. शर्मा यांनी अतिशय परखड शब्दांत भूमिका मांडली. पक्षकारांच्या निराधार आक्षेपांचे समाधान करण्यासाठी न्यायाधीश स्वत:ला सुनावणीपासून दूर ठेऊ शकत नाही. कसलाही आधार नसताना राजकीय नेत्याला एखाद्या संस्थेला हानी पोहचवण्याची मुभा देता येऊ शकणार नाही. न्यायाधीशावरील वैयक्तिक हल्ला म्हणजे न्याययंत्रणेवरील हल्ला आहे, अशी टिप्पणी त्यांनी केली. 7. युद्धादरम्यान भारत-दक्षिण कोरिया मैत्रीचे नवे पर्व भारताने दक्षिण कोरियासोबत महत्वाचे करार केले. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती ली जे. म्युंग यांच्यात व्दिपक्षीय बैठक झाली. दोन्ही देशांनी 2030 पर्यंत व्दिपक्षीय व्यापार दुप्पट करत 50 अरब डॉलरपर्यंत करण्याचा निर्णय घेतला. यासोबतच दोन्ही देशात ऊर्जा, प्राैद्योगिक, चिप, युद्धनाैका अशी 15 महत्वाची करार झाली. या करारावर दोन्ही देशांनी सह्या केल्या. व्यापार वाढवण्याकरिता दोन्ही देशांनी एक खास समितीची स्थापना देखील केली आहे. भारतात दक्षिण कोरियाच्या कंपन्यांना आणण्यासाठी खास प्लॅनही तयार आहे. दरम्यान, अमेरिकेने भारतावर मोठा टॅरिफ लावण्यानंतर भारताने अनेक देशांसोबत व्यापार करार केले. युरोपियन युनियनसोबतही भारताने मोठा करार केला. टॅरिफनंतर अमेरिकेत जाणाऱ्या निर्यातीवर परिणाम झाल्याने हे नुकसान टाळण्यासाठी भारताने जगातील अनेक देशांसोबत थेट मुक्तव्यापार केले. 8. अमेरिका आणि इराणमध्ये पाकिस्तानात निर्णायक चर्चा इस्रायल, इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धविरामासाठी दोन्ही देश पुन्हा एकदा चर्चेसाठी येण्याची शक्यता आहे. अमेरिकेचे उपाध्यक्ष जे.डी. व्हान्स आणि इराणच्या पार्लमेंटचे अध्यक्ष मोहम्मद बाघेर कालिबाफ यांच्यात पाकिस्तानात ही महत्त्वाची बैठक होणार असल्याचे संकेत ‘न्यूयॉक टाइम्स’ने दिले आहेत. या दौऱ्याबाबत सुरुवातीला अनिश्चितता होती, मात्र आता जे.डी. व्हान्स अमेरिकन शिष्टमंडळासह पाकिस्तानात दाखल होत आहेत. जर व्हान्स या चर्चेत प्रत्यक्ष सहभागी झाले, तरच इराणचे प्रतिनिधी कालिबाफ देखील उपस्थित राहतील, असे इराणने स्पष्ट केले आहे. अमेरिका आणि इराणमधील शस्त्रसंधीची मुदत बुधवारी संपत आहे. त्यापूर्वी युद्ध पूर्णपणे थांबवण्यासाठी किंवा शस्त्रसंधीला मुदतवाढ देण्यासाठी ही बैठक अत्यंत निर्णायक ठरणार आहे. या चर्चेकडे आता संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. तिलक वर्माने गुजरातविरुद्ध झळकावलं शतक 9. तिलकच्या शतकानंतर गुजरातचं १०० धावांत ‘पॅक-अप’ आयपीएल २०२६ च्या ३० व्या सामन्यात अखेर मुंबई इंडियन्स सलग चार पराभवानंतर विजयाच्या ट्रॅकवर परतली आहे. या सामन्यात मुंबईने गुजरातचा ९९ धावांनी धुव्वा उडवत हंगामातील आपला दुसरा विजय नोंदवला आहे. या विजयाचा खरा शिल्पकार ठरला तो म्हणजे युवा फलंदाज तिलक वर्मा, ज्याने आपल्या वादळी शतकाने गुजरातच्या गोलंदाजांना निरुत्तर केले. तिलकने अवघ्या ४५ चेंडूंमध्ये नाबाद १०१ धावांची ऐतिहासिक खेळी साकारली. २०० धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना गुजरातचा कोणताही फलंदाज मुंबईच्या गोलंदाजीसमोर टिकू शकला नाही. गुजरातचा संपूर्ण संघ १५.५ षटकांत १०० धावांत गारद झाला. मुंबईने हा सामना ९९ धावांच्या मोठ्या फरकाने खिशात घातला. या सामन्यात मुंबईसाठी पदार्पण करणाऱ्या अश्वनी कुमारने २४ धावा खर्च करत सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. TOP 10 News 10. रितेश देशमुखच्या लेकाचे मनोरंजन विश्वात पदार्पण रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ हा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित चित्रपट १ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत असून नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. चित्रपटात रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. अशातच या चित्रपटातून रितेशचा मुलगा राहिल देशमुख देखील वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत मनोरंजन विश्वात पदार्पण करत आहे. ‘राजा शिवाजी’ सिनेमाच्या ट्रेलरमध्ये रितेश देशमुखचा धाटका लेक राहील देशमुखची झलक पाहायला मिळते. राहिल या चित्रपटात बाल शिवाजी ही भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटात त्याला अभिनय करताना पाहताच अनेकांनी त्याचं कौतु हेही वाचा: Land Division Fees : मोठी बातमी! शेतजमीन वाटणीपत्रासाठी नोंदणी शुल्क माफ; सरकारकडून परिपत्रक जारी