“कडकनाथ’कडून वाई, जावळीतील शेतकऱ्यांचीही 45 लाखांची फसवणूक

वाई – इस्लामपूर येथील महारयत ऍग्रो इंडिया प्रा. लि. या कंपनीने कडकनाथ कोंबडी पालन प्रकरणी वाई व जावळी तालुक्‍यातील शेतकऱ्यांची 44 लाख 57 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी वाई तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला असून कंपनीचे संस्थापक अध्यक्ष सुधीर शंकर मोहिते व सहसंचालक संदीप सुभाष मोहिते यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

अधिक माहिती अशी, वाई तालुक्‍यातील मोतीबाग येथील सुनिल नायकवडी यांनी 4 लाख 50 हजार, विलास नायकवडी (शहाबाग) यांनी 2 लाख, रुपक शेवते (शहाबाग) 7 लाख 20 हजार, अमित ननावरे (बावधन) यांनी 2 लाख 3 हजार, मुयर ननावरे (मोतीबाग) यांनी 60 हजार, अमोल जमदाडे (शांतीनगर) यांनी 1 लाख, संदेश जमदाडे (शांतीनगर) यांनी 1 लाख 33 हजार, अरुण गायकवाड (ओझर्डे) यांनी 1 लाख 20 हजार, जय ननावरे (कवठे) यांनी 1 लाख असे एकूण 20 लाख 86 हजार रुपये वेळोवेळी कडकनाथ कोंबडी पालनासाठी महारयत ऍग्रो इंडियामध्ये भरले होते.

तर जावळी तालुक्‍यातील सनी धुमाळ (सरताळे) यांनी 1 लाख 5 हजार, चेतन गायकवाड (सरताळे) यांनी 1 लाख 33 हजार, वसीम डांगे (कुडाळ), 1 लाख 33 हजार, अभिजित तरडे (बामणोली) 2 लाख 50 हजार, हणमंत पवार (महिगाव) यांनी 75 हजार, महेश महामुलकर (महामुलकरवाडी) 75 हजार, प्रविण गुजर (पानस) 75 हजार, संतोष भिलारे (अमृतवाडी) 5 लाख, सतीश पवार (आलेवाडी) यांनी 2 लाख 50 हजार, नलिनी दळवी (म्हाते खुर्द) 1 लाख रुपये असे वाई व जावळी तालुक्‍यातील शेतकऱ्यांची एकुण 44 लाख 57 हजार रुपये कंपनीत भरले असून त्यांची आर्थिक फसणूक करण्यात आल्याची तक्रार वाईतील शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.