दि.6 ते 11 सप्टेंबर : वाहतूक मार्गांत मोठे बदल

पुणे – शहराच्या विविध भागांमध्ये गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. त्याचबरोबर देखावे आणि विद्युत रोषणाई केली आहे. हे देखावे पाहण्यासाठी नागरिक गर्दी करतात. त्यामुळे अनेक प्रमुख रस्त्यांवर वाहतूक कोंडी निर्माण होते. यावेळी होणारी संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक मार्गांत बदल करण्यात आला आहे. तर दि.6 ते 11 सप्टेंबर हे सहा दिवस दररोज सायंकाळी 5 वाजल्यापासून गर्दी संपेपर्यंत हा बदल असणार आहे. तर पुढील आदेशापर्यंत बेलबाग चौक ते रामेश्‍वर चौक हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद असणार आहे.

लक्ष्मी रस्ता : हमजेखान चौक ते टिळक चौक मार्ग बंद.
पर्यायी मार्ग : डुल्या मारुती चौक उजवीकडे वळून दूधभट्टीवरून सरळ दारूवाला चौक-अपोलो टॉकिज-मारणे रस्त्यावरुन सिंचन भवनापासून डावीकडे वळून, शाहीर अमर शेख चौक ते कुंभारवेस चौक मनपा भवन पाठीमागील रस्त्याने जावे. हमजेखान चौक डावीकडे वळून-महाराणा प्रताप रस्त्याने सरळ घोरपडी पेठ पोलीस चौकी-त्यानंतर पुढे शंकरशेठ रोडने जावे.

कुंभारवेस चौक – पवळे चौक, साततोटी चौक, योजना हॉटेल उजवीकडे वळून देवजी बाबाजी चौक, महजेखान चौक, महाराणा प्रताप रोड मार्गे घोरपडी पेठ पोलीस चौकी.
वाहतुकीच्या परिस्थितीनुसार दुचाकी वाहने लाल महालापर्यंत सोडण्यात येतील. त्यानंतर त्यांनी फडके हौद चौकाकडे किंवा उजवीकडील फुटका बुरूजाकडून इच्छितस्थळी जावे.शिवाजीनगर ते पुणे स्टेशन-हडपसरकडे जाणाऱ्या बसेस या जिजामाता चौकातून डावीकडे वळून फडके हौद चौक-दारूवाला पूलमार्गे जातील.

सिंहगड गॅरेज, घोरपडी पेठ ते हिराबाग चौक मार्ग बंद.
पर्यायी रस्ता : सिंहगड गॅरेज चौकातून- मन्सराम नाईक रस्ता-
डॉ. कोटनीस रस्ता क्रॉस करुन शिंदे आळी -बाजीराव रस्ता ओलांडून भिकारदास चौकी चौक-खजिना विहीर चौक- टिळक रस्त्याने जावे.
गंजपेठ चौकातून वीर लहुजी वस्ताद तालमीकडे जाण्यास बंदी

दिनकर जवळकर पथ ते पायगुडे चौक (जोशी आळी) हिराबाग चौक मार्ग बंद
पर्यायी मार्ग : दिनकर जवळकर पथ-बाजीराव रोड-डावीकडे वळून, टेलिफोन भवन ते पुरम चौक-टिळक रोडने पुढे इच्छितस्थळी जावे.

कोहीनूर चौक ते बाबाजान चौक मार्ग बंद
पर्यायी मार्ग : महावीर चौक- सरबतवाला चौक या मार्गाचा वापर करावा.

शिवाजी रोड : गाडगीळ चौक ते जेधे चौक मार्ग बंद
पर्यायी मार्ग : शिवाजी नगरहून स्वारगेटकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांनी स.गो. बर्वे चौक -जेएम रस्ता-अलका टॉकिज चौक- टिळक रोड किंवा शास्त्री रस्त्याचा वापर करावा. तसेच सिमला ऑफिस चौक-कामगार पुतळा-शाहीर अमर शेख चौक-बोल्हाई चौकमार्गे नेहरू रस्त्याचा वापर करावा.

बेलबाग चौक ते रामेश्‍वर चौक हा सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहणार आहे. त्यामुळे स्वारगेटकडे जाणारी पीएमपीसह हलकी वाहने बेलबाग चौकातून सेवासदन मार्गे पुढे जातील. स्वारगेटकडे जाणाऱ्या पीएमपी बसेस स.गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रस्ता-टिळक चौक मार्गे टिळक रस्त्याने स्वारगेटकडे जातील.

बाजीराव रस्ता : पुरम चौक ते आप्पा बळवंत चौक
टेलिफोन भवन ते पुरम चौक या रस्त्यावरील एकेरी वाहतुकीत बदल करून दुहेरी वाहतूक करण्यात येणार आहे.
पर्यायी मार्ग : पुरम चौक टिळक रोडने टिळक चौकातून केळकर रोडने अप्पा बळवंत चौकात जाता येणार आहे.

सणस रस्ता : गोटीराम भैय्या चौक ते गोविंद हलवाई चौक रस्ता बंद.
पर्यायी मार्ग : चौक-गाडीखाना-सुभेदार तालीम-डावीकडे वळून कस्तुरे चौक- डावीकडे वळून पुढे जावे.

पानघंटी चौक ते गंज पेठ चौकी बंद
पर्यायी मार्ग : पानघंटी चौक-जैन मंदिर चौक- फुलवाला चौक- कस्तुरे चौक- उजवीकडे वळून गंजपेठ चौकीमार्गे पुढे

गावकसाब मशिद ते सेंट्रल स्ट्रीट चौकी रस्ता बंद
पर्यायी मार्ग : गावकसाब मशिद- बाबाजान चौक- सरबतवाला चौक- सेंट्रल स्ट्रीट चौकी, सेंट्रल स्ट्रीट -इंदिरा गांधी चौक-डावीकडे वळून भगवान महावीर चौक मार्गे पुढे जावे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)