मुंबई – सर्वांचे मनोरंजन करणारा, ‘बिग बॉस’चा सीझन 16 हा आतापर्यंतचा सर्वात यशस्वी नॉनफिक्शन टेलिव्हिजन रिएलिटी शो ठरला आहे. यंदाच्या ‘बिग बॉस 16’च्या ट्रॉफीवर बस्ती का हस्ती म्हणून ओळखणारा जाणारा ‘एमसी स्टॅन’ने आपले नाव कोरले असले तरी, या सीझन मधील सर्वच स्पर्धक सतत चर्चेत असतात.
अश्यातच, बिग बॉसच्या घरातील मंडली गँग म्हणजेच, ‘एमसी स्टॅन, शिव ठाकरे, अब्दू रोजिक, साजिद खान, निम्रत काैर आणि सुंबुल’ यांच्यातील मैत्रीला ग्रहण लागल्याचं दिसून आलं आहे. या सीझनमध्ये मंडली गँगची मैत्री चांगलीच गाजली होती. मात्र, आता या गॅंग मधील छोटा भाई जान म्हणजेच “अब्दू रोजिक’ आणि बिग बीस विजेता ‘एमसी स्टॅन’ यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून वाद होताना दिसत आहे.
अब्दू रोजिक याने एमसी स्टॅन याच्यावर काही गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे आता त्यांच्या मैत्रीत वितुष्ट आल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, मंडली गँगची दोस्ती टिकवण्यासाठी या वादावर आता शिव ठाकरे याने देखील उडी घेतली आहे. अब्दू रोजिक आणि एमसी स्टॅन यांच्या वादावर आता शिव ठाकरे याने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी बोलताना शिव म्हणाला, “अब्दू रोजिक आणि एमसी स्टॅन हे दोघेही रिअल आहेत. ते कायमच कॅमेऱ्यासमोर देखील रिअल राहिले. मला पूर्णपणे विश्वास आहे की, दोघे लवकरच एकमेकांना लव यू म्हणतील. खऱ्या मैत्रीमध्ये वाद होतो असेही शिव यावेळी म्हणाला.