नगर – कमी मटण खल्ले म्हणून एकास अंगावर पेट्रोल ओतून दोघांनी पेटवून दिले. संबंधितास उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा प्रकार नगर तालुक्यातील गुंडेगाव येथे सोमवारी (दि.14) रोजी सायंकाळी घडला. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायलयात हजर केले असता त्यांना (दि.19) पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.
संजय पोपट जाधव (वय- 48, रा. गुंडेगाव, ता. नगर) असे जखमी झालेल्याचे व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी अधीक माहिती अशी की, बापू एकनाथ हराळ, ज्ञानदेव उत्तम कुसळकर (दोघे रा. गुंडेगाव) यांनी सोमवारी (दि.14) रोजी सायंकाळी सात वाजता संजय जाधव यांना जेवणासाठी घरी बोलावले. यावेळी जेवनासाठी मटणाचा बेत करण्यात आला होता. हे तिघे जेवायला बसले असता हारळ व कुसळकर यांनी जाधव यांना जास्त मटण वाढले. मात्र, जाधव यांचे पोट भरल्याने त्यांनी मटण खाण्यास नकार दिला.
याचा हाराळ व कुसळकर यांना राग आल्याने त्यांनी जाधव यास मारहाण केली. त्यानंतर त्यांना रामेश्वर मंगल कार्यालयात आणले तेथे त्यांनी जाधव यांच्या गुदद्वारात टोकदार वस्तू घुसवून गंभीर दुखापत केली. त्यानंतर अंगावर पेट्रोल ओतून त्यांना पेटवून दिले. यामध्ये जाधव गंभीर जखमी झाले. जाधव यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.