करोनामुळे शिक्षणाला ब्रेक लागू नये म्हणून ‘फ्रेश एअर स्कूल्स’

माद्रिद – निसर्गाच्या सान्निध्यात शिक्षण घेण्याची गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची संकल्पना आता जगाच्या कानाकोपऱ्यात ही स्वीकारली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता स्पेनमध्ये  तीन वर्षे ते 12 वर्षे या वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी समुद्र किनाऱ्यावरच फ्रेश एअर स्कूल सुरू करण्यात आली आहेत.

करोना परिस्थितीमुळे दीर्घकाळ शाळा बंद असल्यामुळे शाळा परत सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना मोकळा श्वास घेता यावा आणि त्यांच्या मनावरील ओझे कमी व्हावे या उद्देशाने या फ्रेश एअर शाळा सुरू करण्यात आल्या आहेत.

बीचवर भरणाऱ्या या शाळांमध्ये नेहमीचे शिक्षण देत असतानाच करोना महामारी परिस्थितीची माहिती दिली जाणार आहे सध्या प्रायोगिक तत्त्वावर काही ठिकाणी या शाळा सुरू केल्या असून या शाळांना विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती शिक्षक जुआन फ्रान्सिस्को यांनी दिली.

फ्रेश एअर शाळांमध्ये विद्यार्थी पूर्वीपेक्षा जास्त चांगल्या प्रकारे शिकत असल्याचेही त्यांनी सांगितले. बीचवर भरवण्यात येणाऱ्या या शाळांमध्ये सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन करून विद्यार्थ्यांना लांब अंतरावर बसवण्यात येते. 20  मिनिटाचा एक तास संपला की अनेक व्यावहारिक गोष्टी विद्यार्थ्यांना शिकवल्या जातात. विद्यार्थ्यांना आवडणारी कार्टून कॅरेक्टर आणि इतर संकल्पनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रायोगिक शिक्षण दिले जाते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.