देहूरोड कॅन्टोन्मेंटच्या वॉर्ड पुनर्रचनेला केंद्राकडून मंजुरी

मतदार यादी कॅन्टोन्मेंटच्या नोटीस बोर्डवर जाहीर

देहूरोड – देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वार्ड पुनर्रचनेच्या प्रस्तावास केंद्र सरकारकडून नुकतीच मंजुरी मिळाली. 15 एप्रिल रोजी राज पत्राद्वारे मंजूर झालेली (नव्याने तयार करण्यात आलेली) वार्ड पुनर्रचना बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरुप हरितवाल यांनी शुक्रवारी (दि. 23) प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रसिद्ध केले आहे.

नवीन वॉर्ड रचनेप्रमाणे सातही वॉर्डची एकूण मतदार संख्या 25,686 असून, प्रत्येक वॉर्डची महिला, पुरुष व एकूण मतदार संख्या कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या नोटीस बोर्डवर माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

महिला आरक्षणाची सोडत बुधवारी
देहूरोड कॅन्टोन्मेन्ट बोर्डच्या आगामी निवडणुकीकरिता महिला वॉर्ड आरक्षणाची सोडत बुधवारी (दि. 28) सकाळी 11.00 वाजता बोर्डाच्या कार्यालयात कॅन्टोन्मेन्ट बोर्डाचे अध्यक्ष यांच्या हस्ते काढण्यात येणार आहे. राज्यात लॉकडॉउन सुरू आहे तसेच करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सोडत कार्यक्रमास कमीत कमी नागरिकांनी (राजकीय पक्षाचे अध्यक्ष व पत्रकार) उपस्थित रहावे. कॅन्टोन्मेन्ट प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरूप हरितवाल यांनी केले आहे. तसेच आरक्षण सोडत कार्यक्रमाची रेकॉर्डिंग (फुटेज) नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध करण्यात येईल. त्याचप्रमाणे सदर कार्यक्रमांचे रेकॉर्डिंग असल्यास ते उपलब्ध करण्यात येईल.

वॉर्ड निहाय समाविष्ट विभाग

वॉर्ड रचना आणि वॉर्डातील एकूण मतदार संख्या पुढीलप्रमाणे
वॉर्ड क्रमांक 1 – कोटेश्‍वरवाडी, माळवाडी, कुंडमळा, शेलार मळा, एम ई एस पंप हाउस, गुरुद्वारा, इंद्रायणी दर्शन, सेन्ट ज्युड चर्च, सर्वत्र नगर, रेल्वे क्वॉर्टर व मिलिटरी मतदार (3727)
वार्ड क्र. 2 – अमरदेवी मंदिर, एल आय जी क्वॉर्टर, थॉमस कॉलनी, आश्रम रोड, इंद्रलोक, कुटुंबिनी सोसायटी, नायडू क्वॉर्टर, गायकवाड चाळ, शितळानगर (आईस फॅक्‍टरी जवळील भाग) (3685)
वार्ड क्र. 3 – बरलोटानगर, मामुर्डी गाव, शगुन सोसायटी, कोहली गॅस, इंदविहार, उदयगिरी, मेहतापार्क, के एम पार्क,
कुणाल हॉटेलजवळील सोसा., पोलीस लाईन.(3396)
वार्ड क्र. 4 – संकल्पनगरी, गुलमोहर अपार्टमेन्ट, एम बी कॅम्प, भारतरत्न सोसा. इंदपूरम, इंद्रप्रस्थ व टेलीफोन एक्‍सेज मागील सर्व सोसायटी, दांगट चाळ, बन्सल अपार्टमेन्ट, मुबंई पुणे रोड, सत्यस्वप्न व यश अपार्टमेन्ट, तांबोळी बिल्डींग, राठोड चाळ, कुंभार चाळ, नागप्पा बिल्डींग,
भैरट चाळ सद्गुरू अपार्टमेन्ट व रेल्वे क्वॉर्टर. (3396)
वार्ड क्र. 5 -सिद्धिविनायकनगरी, श्रीविहार, श्रीनगरी, दत्तनगर, परमार कॉम्पलेक्‍स, समर्थनगरी व पुनागेट (3555)
वार्ड क्र. 6 – चिंचोली, गार्डनसिटी,
सेन्ट्रल स्कुल -1, अल्कापुरी व मिलिटरी मतदार (3377)
वार्ड क्र. 7 – झेंडेमळा, हगवणेमळा,
कारके व काळोखेमळा, किन्हई, आयुध निर्माणी वसाहत, केंद्रीय विद्यालय नं -2 व मिलिटरी मतदार ( 4140)

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.