पॅरिस – ग्रीसचा भरात असलेला टेनिसपटू स्टेफोनोस त्सित्सिपास याने फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात रशियाच्या डॅनियल मेदवेदेव याचा पराभव केला. या विजयासह त्सित्सिपासने उपांत्य फेरीत प्रवेश केला.
या सामन्यात त्सित्सिपास याने 6-3, 7-6, 7-5 असा सरळ तीन सेटमध्ये पराभव करत यंदाच्या ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेत प्रथमच उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्सित्सिपासने या सामन्यात 20 तर, मेदवेदेवने 14 गेम जिंकल्या. हा सामना पहिला सेट वगळता अत्यंत रोमहर्षक ठरला.
या दोन खेळाडूंमध्ये आजवर 7 सामने झाले असून त्यात 6 वेळा मेदवेदेवनेच वर्चस्व राखले आहे. तर केवळ एकदाच त्सित्सिपासला विजय मिळवता आला. बुधवारच्या सामन्यात मात्र, त्सित्सिपासने मेदवेदेवला अत्यंत कडवा प्रतिकार केला. आता त्याला अंतिम फेरीत स्थान मिळवण्याची संधी आहे.
महिलांच्या एकेरीत रशियाची ऍनिास्ताशिया पेव्हल्यूचेन्कोव्हा या बिगरनामांकित टेनिसपटूने उपांत्य फेरीत मजल मारली. तीनेही प्रथमच ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे. महिला एकेरीतील सामन्यात आता स्लोव्हाकियाची नवोदित टेनिसपटू तमारा झीदानसेकशी तीचा सामना होणार आहे. पेव्हल्यूचेन्कोव्हा हिने प्रथमच उपांत्य फेरी गाठताना दुहेरीतील सहकारी एलेना रबाकिना हिच्यावर 6-7 (2-7), 6-2, 9-7 अशी मात केली.