पावसाळ्यात फ्रीज असा ठेवा स्वच्छ 

पावसाळ्यात घरातील सर्वच वस्तूंची काळजी घ्यावी लागते. इलेक्‍ट्रॉनिक वस्तू पावसाच्या पाण्यामुळे किंवा ओलसर जमिनीमुळे तसेच ओलसर भिंतींमुळे खराब होऊ नये म्हणून आपण दक्षता घेतो. मिक्‍सरचे भांडे वापरून झाले की तसेच वॉशिंग मशीनचे काम झाले की लगेच स्वच्छ करतो. पण फ्रीजसारख्या आवश्‍यक आणि महागड्या वस्तूकडे थोडेफार दुर्लक्ष होते.

मात्र पावसाळ्यात फ्रीज ठराविक दिवसांनी स्वच्छ करावा. कारण फ्रीज ठराविक काळाने स्वच्छ केला नाही तर त्यातून दुर्गंधी येते. त्यामुळे फ्रीजमधील पदार्थही लवकर खराब होतात. काही पदार्थ बरेच दिवस फ्रीजमध्ये पडून असतीलदिवसांनंतर फ्रीजमधून काढून टाकावे.
फ्रीज स्वच्छ करण्यापूर्वी फ्रीज डी-फ्रॉस्ट करा.

नको असलेले पदार्थ काढून टाका. पाणी आणि खाण्याचा सोडा एकत्र करून फ्रीज स्वच्छ करा. लिंबाचा रस आणि पाणी एकत्र करून वापरल्यास फ्रीजमध्ये दुर्गंधी येत नाही. फ्रीज कोरड्या कापडाने पुसून घ्या. किमान दोन आठवड्यातून एकदा फ्रीजची साफसफाई करा.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.