टेकिला अ‍ॅकॅडमी तर्फे सेल्सफोर्स या आधुनिक तंत्रज्ञानाचे विद्यार्थ्यांना विनामूल्य व्यावसायिक प्रशिक्षण

२ महिन्यात ५०० पेक्षा आधीक विद्यार्थ्यांना व व्यावसायिकांना याचा लाभ घेतला

कोविड -१९ अर्थात कोरोना विषाणूच्या प्रसाराचा भारतासह संपूर्ण जगातील प्रत्येक घटकावर अत्यंत खोलवर परिणाम झाला आहे. यात अनेकांच्या उद्योग, नोकऱ्यांवर परिणाम झाला. अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लावल्यामुळे परिवाराची आर्थिक स्थिती डगमगली.  याचा परिणाम कुटुंबातील मुलांच्या शिक्षणावर देखील झाला. भल्यामोठ्या शिक्षण संस्थांच्या फी भरणे या काळात पालकांना अशक्य होऊन बसले. अशाच काळात तंत्रज्ञानाची रुची असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुण्यातील ‘टेकिला अ‍ॅकॅडमी’ पुढे आली.

टेकिला अ‍ॅकॅडमी चा उद्देश सेवा क्षेत्रातील आणि सेल्सफोर्स क्षेत्रातील कुशल व जाणकार विद्यार्थ्यांना व व्यावसायिकांना मोफत प्रशिक्षण देणे आहे. या अ‍ॅकॅडमीची सुरुवात टेकिला ग्लोबल सर्व्हिसेस चे मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री. क्षितिज अग्रवाल यांनी केली. शिक्षण ही अशी एक गोष्ट आहे जी समाजावर दीर्घकालीन प्रभाव पाडते. म्हणून श्री. अग्रवाल यांनी सेवा क्षेत्रात सुधार व प्रगती आणण्यासाठी शिक्षणाची निवड केली.

अ‍ॅकॅडमी बद्दल सांगताना श्री. क्षितिज अग्रवाल म्हणाले कि “टेकिला अ‍ॅकॅडमीची स्थापना दि. ५ सप्टेंबर २०२० रोजी शिक्षक दिना निम्मित करण्यात आली. आता पर्यंत आम्ही पाचशे पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना व व्यावसायिकांना मोफत प्रशिक्षण दिले आहे. सेल्सफोर्स हे एक अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे आणि त्यासाठीच्या प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांना २५ हजार ते एक लाख मोजावे लागतात. हा एवढा खर्च आताच्या कोरोना काळात करणे विद्यार्थ्यांना अशक्य होत आहे.”

या पुढे ते म्हणाले की ” सुरुवातीला आम्ही दरमहा १०० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचे ठरवले पण पहिल्याच महिन्यात आमच्याकडे १०० पेक्षा अधिक नोंदणी झाली, यामुळे आम्हाला अधिक प्रेरणा मिळाली” असे श्री. अग्रवाल म्हणाले.

टेकिला अ‍ॅकॅडमी च्या अंतर्गत प्रशिक्षण कार्यक्रमात चार सत्रे असतात. मार्केटिंग क्लाउड, सेल्सफोर्स अ‍ॅडमीन, सेल्सफोर्स डेव्हलपमेंट आणि परडोट. प्रशिक्षण कालावधी हा २ महिने असून यात विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयाची विस्तृत माहिती देण्यात येते ज्याचा उपयोग त्यांना भविष्यात होतो.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.