पुणे – शहरात सध्या करोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. मात्र, अशाही स्थितीत अत्यावश्यक सेवा अविरतपणे त्यांच्याबाजूने जनजागृती करण्यासाठी अहोरात्र झटत आहेत. तरी या अत्यावश्यक सेवा बजावणार्यांच्या दुचाकीमध्ये बिघाड झाल्यास त्यांना नि:शुल्क सेवा देण्यासाठी स्कूटर, मोटरसायकल रिपेअर असोसिएशनने पुढाकार घेतला आहे.
शहरातील सुमारे 60 ते 70 दुचाकी संस्थेतर्फे दुरुस्त करून देण्यात आल्या आहेत. संचारबंदी लागू असल्याने शहरातील दुचाकी दुरुस्तीची दुकाने बंद आहेत. त्यामुळे अत्यावश्यक सेवेत काम करणार्या डॉक्टर, परिचारीका, प्रशासन, पोलीस यंत्रणा, पत्रकार यांच्या दुचाकींमध्ये बिघाड झाल्यास ही व्यवस्था केलेली आहे. असोशिएशनसह सुमारे 300 मॅकेनिक जोडलेले आहेत.
मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्येही असोशिएशनचे सदस्य आहेत. अत्यावश्यक सेवादेणार्यांच्या दुचाकीत बिघाड झाल्यास 9823055665, 822011699, 9422562240 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.