वाघोली – संसदरत्न खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त सिरम इन्स्टिट्यूट, नोबेल हॉस्पिटल व पुणे जिल्हापरिषदेच्या विशेष सहकार्याने शिरूर लोकसभा मतदार संघात हवेली तालुक्यातील तीस हजार नागरिकांना मोफत कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते तथा माजी उपसरपंच राजेंद्र सातव पाटील व माजी सरपंच जयश्री सातव पाटील यांनी केले आहे.
संसदरत्न खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त सिरम इन्स्टिट्यूट, नोबेल हॉस्पिटल व पुणे जिल्हापरिषदेच्या विशेष सहकार्याने वाघोली येथे विविध ठिकाणी नागरिकांना मोफत कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरण करण्याचे आयोजन करण्यात आले आहे यात. दत्तकृपा महिला बचत गट बिल्डींग राममंदिर, बालाजी पार्क केसनंद रोड, आकाश हॉटेल लोहगाव रोड, उबाळे नगर या ठिकाणी लसीकरण सुरु करण्यात आले.
मोफत लसीकरण मोहिमेचा वाघोली येथे करण्यात आला यावेळी येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते राजेंद्र सातव पाटील, माजी सरपंच जयश्री सातव पाटील, बाळासाहेब भाऊसाहेब सातव पाटील, अतुल शिंदे, सचिन काळे, गणेश सातव पाटील, योगेश सातव, चंद्रकला शिंदे,शिरसाठ बाई, पुष्पा जगताप, स्मिता शिरसागर, सुरभी शिरसागर,रोहिणी सातव, वैशाली बहिरट, छाया बहिरट, रागिणी कदम,सुनीता शिंदे, भाग्यश्री घोरपडे, वर्षा सातव आदी मान्यवर उपस्थित होते.