वाघोलीत दोन हजार नागरिकांना भाजपच्या वतीने मोफत लसीकरण

वाघोली – वाघोली तालुका हवेली येथे भारताचे सर्वात यशस्वी पंतप्रधान  नरेंद्र मोदी जी यांच्या वाढदिवसानिमित्त व पंडित स्व. दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त सेवा समर्पण  सप्ताह कार्यक्रम निमित्ताने भारतीय जनता पार्टीच्या वतीने मोफत दोन हजार नागरिकांना लसीकरण करण्यात येणार आहे.

या उपक्रमासाठी महाराष्ट्र प्रदेश भाजप युवा मोर्चा राज्य कार्यकारणी सदस्य गणेश कुटे, पुणे जिल्हा भाजप युवा मोर्चा संघटन सरचिटणीस संदीप सातव, हवेली तालुका क्रीडा विभाग भाजप अध्यक्ष विजय जाचक, हवेली तालुका भाजप उपाध्यक्ष प्रदीप सातव पाटील, पुणे जिल्हा भाजप युवा मोर्चा उपाध्यक्ष शरद आव्हाळे, पुणे जिल्हा भाजप युवा मोर्चा उपाध्यक्ष गणेश सातव, पुणे जिल्हा व्यापारी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष जयप्रकाश  सातव पाटील आदी परिश्रम घेत आहेत.

दिनांक 25 रोजी पासून विघ्नहर्ता क्लीनिक, डोमखेल रोड भक्ती गर्ल्स हॉस्टेल बिल्डिंग रायसोनी कॉलेज शेजारी वाघोली येथे कोविशील्ड लस पहिला व दुसरा डोस देण्यात येणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.