पत्रकारांना वातानुकूलित शिवशाही बसमध्ये मोफत प्रवास

मुंबई: एसटी महामंडळामार्फत समाजातील विविध घटकांना प्रवास सवलत दिली जाते. या प्रवास सवलतींची व्याप्ती वाढविण्यासंदर्भात एसटी महामंडळाने सादर केलेल्या प्रस्तावास आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आल्याची माहिती परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी आज येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. यात पत्रकारांना वातानुकूलित शिवशाही बसमध्ये मोफत प्रवास सवलत योजना लागू करण्यात आली.

अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना प्रवास सवलत

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सध्या सर्वसाधारण व निमआराम बसमध्ये वर्षभर 100 टक्के प्रवास सवलत लागू आहे. आता वातानुकुलित शिवशाही (आसनी व शयनयान) बसेसमध्येही 100 टक्के सवलत लागू करण्यात येत आहे. या योजनेचे सध्या 2800 लाभार्थी आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)