मागणीवर पीएमपी प्रशासनाचा सकारात्मक विचार
पुणे – पुणे परिवहन महामंडळाच्या खास महिलांसाठी धावणाऱ्या तेजस्विनी बसेस प्रमाणे अन्य बसेसमध्ये महिलांना दर महिन्याच्या 8 तारखेला मोफत प्रवास करता यावा, यासाठी महिला प्रवाशांकडून मागणी होत आहे. याबद्दल सकारात्मक विचार करण्यात येत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
पीएमपी बसेसच्या माध्यमातून दररोज हजारो महिला प्रवास करतात. त्यांचा विचार करता पीएमपीच्या वतीने सुमारे 42 मार्गांवर महिलांसाठी विशेष तेजस्विनी बसेस सोडण्यात येतात. यंदाच्या महिला दिनापासून तेजस्विनीच्या महिला प्रवाशांना दिलासा देणारी योजना राबविण्यात येत आहे. महामंडळाच्या वतीने महिन्यातून एक दिवस महिलांना मोफत प्रवास करण्याची सवलत देण्यात येते. मात्र, ही सवलत केवळ तेजस्विनी बसेससाठी मर्यादित न ठेवता अन्य बसेसमध्ये देखील राबवावी, अशी वारंवार प्रशासनाकडे करण्यात येत होती.