बेरोजगारांसाठी मंचर येथे मोफत प्रशिक्षण

मंचर- येथील ज्ञानशक्‍ती विकास वाहिनी संस्थेच्या वतीने आंबेगाव, जुन्नर व खेड तालुक्‍यातील आदिवासी बेरोजगार युवक, युवती व महिलांसाठी फॅशन डिझाईनिंग, नर्सिंग असिस्टंट, बॅग मेकिंग या प्रशिक्षणाची विनामुल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे, अशी माहिती ज्ञानशक्ती विकास वाहिनी संस्थेच्या कार्यकारी संचालिका गार्गी वळसे पाटील यांनी दिली.

प्रशिक्षणाचा कालावधी तीन महिने आहे.बॅग मेकिंग,फॅशन डिझायनिंग या प्रशिक्षणासाठीशैक्षणिक पात्रता इयत्ता 7 व नर्सिंग असिस्टंट या प्रशिक्षणासाठी किमान दहावी उत्तीर्ण अशी अट आहे. 18 ते 35 पर्यंत वयोमर्यादा असलेल्याना मोफत प्रशिक्षणाचा लाभ घेता येणार आहे.

प्रशिक्षणार्थीला प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रवास भत्ता व रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. प्रवेशासाठी ज्ञानशक्‍ती विकास वाहिनी, डी. एस. के.प्राईड, दुसरा मजला, इंद्रायणी हॉटेलच्या शेजारी, पुणे-नाशिक महामार्ग, मंचर येथे सकाळी 11 ते दुपारी 4 या कार्यालयीन वेळेत संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.