पुणे – छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) यांच्यातर्फे मराठा समाजातील उमेवारांना पोलीस भरतीपूर्व लेखी परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी नि:शुल्क ऑनलाइन प्रशिक्षण घेण्यात येणार आहे.
त्यासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली असून, आता उमेदवारांना 20 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे.
उमेदवारांना पोलीस दलात सहभागी होऊ कार्य करण्याची इच्छा असते. परंतु अनेक वेळा हे प्रशिक्षण, त्यातील महत्त्वाचे भरतीचे टप्पे याबाबत अपुरी माहिती, योग्य मार्गदर्शनाचा अभाव, दुर्गम ठिकाणी निवास व आर्थिक अडचणींमुळे युवकांना पोलीस दलात भरतीसाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर सारथीतर्फे ऑनलाइन लेखी परीक्षेचे नि:शुल्क प्रशिक्षण दोन महिने घेण्यात येणार आहे. त्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 5 फेब्रुवारीपर्यंत मुदत होती. ती आता 20 फेब्रुवारीपर्यंत वाढविण्यात आल्याची माहिती सारथीतर्फे देण्यात आली आहे.