पुसेसावळीत जवानांसाठी मोफत तपासणी, उपचार

सामाजिक बांधिलकीतून डॉ.प्रतापराव जगदाळे यांचा एक वर्षांपासून अनोखा उपक्रम
अविनाश काशीद

पुसेसावळी  – देशाच्या सीमेवर 24 तास 365 दिवस तैनात राहून कोट्यवधी भारतीयांची सुरक्षा करणाऱ्या जवानांसाठी खासगी दवाखान्यातही मोफत तपासणी व उपचार करण्यासाठी मागील एक वर्षांपासुन पुसेसावळीतील डॉ. प्रतापराव जगदाळे यांनी पुढाकार घेतला आहे. पुसेसावळीसारख्या ग्रामीण भागात सामाजिक बांधिलकी जपणारे डॉ.प्रतापराव जगदाळे यांच्या श्रध्दा रुग्णालयात मोफत तपासणी संदर्भात लावलेला फलक सगळ्यांचे लक्ष वेधुन घेतो. दि. 14 फ्रेब्रुवारी रोजी जम्मू काश्‍मीरमध्ये पुलवामा येथे सीमेवर लढणाऱ्या जवानांच्या वाहनांवर आंतकवाद्यांनी भ्याड हल्हा केला. या हल्ल्यात अनेक जवानांना वीरमरण आले.

संपुर्ण देश दु:खात बुडाला. प्रत्येक भागात निषेध मोर्चा, बंद, कॅडल मार्च काढून जवानांना श्रध्दांजली अर्पित करण्यात आली. अनेक सामाजिक संस्था, उद्योगपती जवानांसाठी व त्यांच्या कुटुंबियासाठी अनेक स्वरुपात आपले योगदान देत आहे. असेच योगदान पुसेसावळी सारख्या ग्रामीण भागातील सामाजिक बांधिलकी जपणारे डॉ. प्रताप जगदाळे यांनी त्यांच्या वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून गेल्या एक वर्षांपासुन देत आहेत. श्रध्दा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या प्रत्येक जवानांनी तपासणीचे पैसे देवू नये, अशा प्रकारचा फलकच त्यांनी आपल्या रुग्णालयात लावलेला आहे.
डॉ. जगदाळे गेली वीस वर्षांपासून पुसेसावळीत सेवाभावी वृत्तीने वैद्यकीय सेवेत कार्यरत असून त्याचबरोबर सामाजिक कार्यातही अग्रेसर असतात.

गोरगरिब रुग्णांना योग्य मार्गदर्शन, समुपदेशन,तसेच आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून निरोगी व आरोग्यपुर्ण पिढी घडविण्यायासाठी योग व ध्यानधारणा शिबिर, व्यक्तीमत्व विकास कार्यशाळा, विविध मान्यवरांची व्याख्याने, हॅप्पीनेस प्रोग्राम,शेतकऱ्यांसाठी नैसर्गिक शेती कार्यशाळा असे विविध उपक्रम राबविण्यात त्यांचा सक्रीय सहभागअसतो. जवांनासाठी मोफत तपासणी व उपचार या श्रध्दा रुग्णालयाच्या माधयमातून राबविणयात येणाऱ्या उपक्रमाचे समाजाच्या सर्व स्तरातून मोठ्या प्रमाणात कौतुक करण्यात येत आहे.

आपले जवान देशाच्या सिमेवर 24 तास 365 दिवस तैनात राहून भारतीयांची सुरक्षा करतात. म्हणुनच आपण सुरक्षित आहोत, म्हणुनच आम्ही सामाजिक बांधिलकीतुन मागील एक वर्षापासून जवांनासाठी मोफत तपासणी हा उपक्रम राबवत आहोत.

-डॉ. प्रतापराव जगदाळे

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.