राजगुरूनगर (प्रतिनिधी) : राक्षेवाडी (ता. खेड) ग्रामपंचायतीने मोठा निर्णय घेत करोना विषाणू संसर्ग बाबत काळजी घेत हद्दीतील एक हजार नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. राज्यातील कोरोना संसर्ग वाढत असल्या कारणास्तव राक्षेवाडी गावातील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याचा निर्णय ग्रामपंचायत मासिक सभेत सरपंच सोनाली सांडभोर यांच्या अध्यक्षतेखाली ठराव करून ग्रामपमचयात हद्दीत असलेल्या नागरिकांची आरोग्य मोफत तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
राजगुरूनगर येथील जैन धर्मार्थ दवाखात्याच्या “कार्डिया ऍम्ब्युलन्स” द्वारे नागरिकांची करोना विषाणू (कोव्हीड १९) व इतर आजारांची मोफत तपासणी करण्यात आली. राक्षेवाडीतील सुमारे एक हजारापेक्षा जास्त नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. आरोग्य तपासणी करताना सोशल डिस्टन्स पाळण्यात आला. यावेळी सरपंच सोनाली सांडभोर, पोलीसपाटील पप्पुकाका राक्षे, रवींद्र सांडभोर, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आदी उपस्थित होते.जैन धर्मात हॉस्पिटलचे डॉ. सूरज वानखेडे यांच्या टीमने नागरिकांची आरोग्य तपासणी केली.
सरपंच सोनाली सांडभोर यांनी सांगितले की, राजगुरूनगर शहराला जोडलेल्या राक्षेवाडी ग्रामपंचत हद्दीत येणाऱ्या आणि जाणाऱ्या व्यक्तींची नोंद वेशीवरच थांबवून आशा वर्कर व ग्रामपंचतीच्या कर्मचाऱ्यांनामार्फत घेतली जात आहे. बाहेर गावावरून येणाऱ्या नागरिकांबाबत खबरदारी घेतली आहे.कोव्हिड१९बाबत जनजागृती करून विशेष काळजी घेतली आहे. लॉकडाऊनच्या नियमाची कडक अमलबजावणी केली जात असून ग्रामपचायत हद्दीत बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून ग्रामपंचायत हद्दीत नजर ठेवण्यात येत आहे