उत्तरप्रदेशात गुन्हेगार मोकाट – प्रियांका गांधी

लखनौ – उत्तरप्रदेशात गुन्हेगार मोकाट सुटले असून ते मनाला येईल तसा धुमाकुळ घालत आहेत अशी टीका कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांच्यावर केली आहे. या गुन्हेगारांपुढे राज्य सरकारने शरणांगती पत्करली आहे काय असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. आपल्या ट्‌विटर अकौंटवर त्यांनी ही टीका केली आहे. गुन्हेगारांनी राज्यात जो धुमाकुळ घातला आहे त्याची कोणतीच वार्ता बहिऱ्या उत्तरप्रदेश सरकारच्या कानी पडताना दिसत नाही.

सरकारने या गुन्हेगारांपुढे लोटांगण घातले आहे काय असे त्यांनी म्हटले आहे. तत्पुर्वी राज्यातील समाजवादी पक्षानेही उत्तरप्रदेश सरकारवर कायदा आणि सुव्यवस्था स्थिती बाबत टीका केली आहे. राज्यातील गुन्हेगारीचे प्रमाण प्रचंड वाढले असल्याची टीकाहीं त्यांनी केली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर आज प्रियांका गांधी यांनी राज्य सरकारला या प्रकरणी धारेवर धरले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.