केडगाव येथे मोफत नेत्रतपासणी शस्त्रक्रिया शिबीर

138 रुग्णांची शस्त्रक्रिये साठी निवड

नगर: केडगाव येथील हरिहरेश्‍वर ग्रामविकास प्रतिष्ठाण एच.व्ही देसाई नेत्र रुग्णालय पुणे व जिव्हाळा ज्येष्ठ नागरीक, अपंग, अनाथ, निराधार मंचाच्या वतीने प्रतिष्ठाणचे अध्यक्ष डॉ. चेमटे श्रीकांत यांनी स्वामी विवेकानंद चौक भुषणनगर केडगाव येथे दि. 19रोजी सकाळी 8 ते 2 या वेळेत मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदु शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष हर्षवर्धन कोतकर होते, तर प्रमुख पाहुणे वसंतराव महाजन, अजुर्ना काळे, सचिन सुर्यवंशी, गंगाधर शिरसाठ, बाबाशेख, बंडुसाठे आदी उपस्थित होते.

प्रथम प्रतिष्ठाणचे अध्यक्ष चेमटे श्रीकांत, व प्रमुख पाहुण्यांच्या यांच्याहस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करुन पुष्पहार अर्पण केला.तसेचसर्व प्रमुख पाहुण्यांचा प्रतिष्ठाणच्या वतीने गौरव करण्यात आला.
प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.चेमटे श्रीकांत यानीां आपल्या प्रास्तविक भाषणात प्रतिष्ठानतर्फे आतापर्यंत राबविलेल्या सामाजिक, क्रिडा, धार्मिक व आरोग्यविषयक, उपकमांची माहिती उपस्थितांना दिली तसेच हे उपक्रम निमित्ताने राबविणार असल्याची ग्वाही दिली.

हर्षवधर्ना कोतकर यांनी प्रतिष्ठाणचे अध्यक्ष डॉ.चेमटे श्रीकांत राबवित असलेल्या उपक्रमांचे कौतुक केले.तसेच हे उपक्रम राबविणे किती कठिण आहे याची माहिती उपस्थितांना दिली.डॉ.चेमटे श्रीकांत यानीां आपले कार्य असेच चालु ठेवावे सर्वसाधुसंतांचे आशिर्वाद त्यांच्या पाठीशी आहेत असे सांगितले. त्यांना आम्हीच कधीच दुर जाऊ देणार नाही त्यांच्या सर्व प्रकारच्या सामाजिक, धार्मिक कार्यास, मदतीस आम्ही सदैव भे राहून असेही त्यानीां आपले विचार मांडताना सांगितले.
एच.व्ही देसाई हॉस्पिटलचे नेत्ररुग्ण डॉ. प्रशांत भांगे यांनी 138 नेत्ररुग्णांची मोफत नेत्र तपासणी करुन औषधोपचार केले. तसेच55 नेत्ररुग्णांची रक्‍तातील साखर रक्‍तदाब तपासणी करुब मोफत मोतीबिंदु शस्त्रक्रियेसाठी निवड करुन शस्त्रक्रियेसाठी एच.व्ही देसाई हॉस्पिटल पुणे येथे पाठविण्यात आले. या कार्यक्रमाला संदिप कुलकर्णी, गंगाधर शिरसाठ, मोर दळवी, राजु भंडारी, संतोष कोतकर आदी मायवर व नेत्ररुग्ण मोठ्या संख्यने उपस्थित होते.योगेश खरमाटे यानीां सर्व उपस्थितांचे आभार मानले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)