आळंदीत “त्या’ रुग्णांची मोफत तपासणी

आळंदी  -करोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ग्रामीण रूग्णालय, आळंदी येथे सर्दी, ताप, कोरडा खोकला व श्‍वास घेण्यास त्रास अशी लक्षणे असलेल्या नागरिकांवर आळंदी डॉक्‍टर असोसिएशन, ग्रामीण रूग्णालय आणि आळंदी नगरपरिषद यांच्या संयुक्‍त विद्यमाने स्थापित डॉक्‍टरांच्या पथकामार्फत मोफत तपासणी करण्यात येत आहे.

या शिबिराकरिता डॉक्‍टरांसाठी पीपीई कीट, एन 95 मास्क, फेस शिल्ड, सर्जिकल गाऊन व ग्लोव्हज आदी साहित्य माजी उपनगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक सचिन रामदास गिलबिले यांच्या माध्यमातून सत्संग सेवा मिशन, पुणे यांच्या वतीने देण्यात आले.

याप्रसंगी नगरसेवक सचिन गिलबिले, फाउंडेशनचे नंदन बाळ, चक्रपाणी शर्मा, राजेश शिरोळे, शीला बाळ, रीचा चतुर्वेदी, राजेंद्र मांडवकर, डॉ. नितीनकुमार जाधव, डॉ. राहूल चव्हाण, डॉ. संदेश निमकर व परिचारिका राणी राऊत आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.