कराड (प्रतिनिधी) – मलकापूर पालिका, विविध सामाजिक सेवाभावी संस्था यांच्या सहकार्याने रेशनकार्ड नसणाऱ्या गरजू व गरीब नागरिकांना गहु, तांदुळ, डाळ यांचे मोफत वाटप आ. पृथ्वीराज चव्हाण व खासदार श्रीनिवास पाटील, ना. सतेज उर्फ बंटी पाटील, इंद्रजित मोहिते, उदयसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, वरिष्ठ पोलीस निरिक्षक बी. आर. पाटील, नगराध्यक्षा निलम येडगे, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, बांधकाम सभापती राजेंद्र यादव, महिला बालकल्याण सभापती आनंदी शिंदे, उपसभापती कमल कुराडे मुख्याधिकारी संजीवनी दळवी व नगरसेवक उपस्थित होते.
मलकापूर नगरपालिकेने लॉकडाऊन काळात शहरातील शेतमजूर, गरजू व गरीब मोलमजुरी करणारे नागरिक, चतुर्थ वर्ग श्रेणीतील कर्मचारी, प्रतिबंधित क्षेत्रामधील गरजू कुटुंबे जीवनावश्यक वस्तुंचे कीट वाटप केले आहेत. तसेच ज्या रेशनकार्ड धारकांना कार्ड असून सुद्धा धान्य मिळत नाही, अशा नागरिकांना स्वस्त धान्य दुकानामधून धान्य उपलब्ध करुन देण्याची विनंती आ. पृथ्वीराज चव्हाण व खा. श्रीनिवास पाटील, यांच्याकडे करण्यात आली होती. ही विनंती शासनाने मान्य करत पुरवठा विभागामार्फत तांदुळ, गहु, चनाडाळ आदी साहित्य उपलब्ध करून दिले. त्याचे वितरण मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. या उपक्रमाचे मलकापूरमधील नागरिकांना स्वागत केले आहे.