तळेगाव दाभाडे : – रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी व मायमर मेडिकल कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने तळेगाव दाभाडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये मोफत मोतीबिंदू चेकअप व शस्त्रक्रिया शिबिर पार पडणार आहे. यासह इतर रोगनिदान चाचण्या होणार आहेत. दिनांक ८ डिसेंबर रोजी सकाळी १० ते २ वेळात शिबिर होणार आहे.
यावेळी डॉ. सुचित्रा नांगरे, डॉ. महेश दर्पणगिरी, अध्यक्ष किरण ओसवाल, दीपक फल्ले, विनोद राठोड, सौरभ मेहता, रेखा भेगडे, अजित वाळुंज, सुबोध मालपाणी आदी उपस्थित राहणार आहेत. यानिमित्ताने कर्तव्यदक्ष नागरिक हा पुरस्कार सुरेश शिंदे यांना देण्यात येणार आहे. तसेच रोटरी कम्युनिटी कॉर्प्स (आरसीसी) आशा वर्कर्स तळेगाव दाभाडे सिटीचा शुभारंभ होणार आहे.
क्लबच्या अध्यक्षपदी अनिता सुनील भेगडे यांची निवड करण्यात आली आहे. उपाध्यक्षपदी मंदाकिनी साळवे, सचिव पदी वैशाली मेठाळ, एडमिन डायरेक्टर शालिनी रणभारे, सल्लागारपदी संतोष परदेशी यांची निवड करण्यात आली आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्ष किरण ओसवाल व सहकाऱ्यांनी केले आहे.