नवी दिल्ली : ग्रेट ब्रिटेन संघाची माजी महिला हाॅकी कर्णधार एलेक्स डेनसन-बेनेट हिने दुखापतीमुळे आंतरराष्ट्रीय हॉकीतून गुरुवारी निवृत्ती जाहीर केली आहे.
🏑We have mixed emotions in reporting that Alex Danson-Bennett has decided to retire from hockey.
It is hugely disappointing to lose a player of her calibre, but we're happy in the knowledge that this is the right decision for her.
Read more: https://t.co/wL0B8THqgy pic.twitter.com/eVnGtsUrcO
— Great Britain Hockey (@GBHockey) February 20, 2020
ग्रेट ब्रिटेनच्या महिला हाॅकी संघाने २०१६ मध्ये रिओ ऑलिम्पिक मध्ये सुवर्णपदक जिंकले होते. त्या संघात डेनसेन-बेनेटचा समावेश होता. तिने या स्पर्धेत सर्वाधिक गोल करत संयुक्तरित्या अव्वलस्थान पटकावले होते.
डेनसन-बेनेट हिला १८ महिन्यांपूर्वी डोक्याला दुखापत झाली होती. तेव्हापासून ती एकही सामना खेळू शकलेली नाही आणि अखेर तिने हाॅकीतून निवृत्ती जाहीर केली.