पुणे : विवाहविषयक संकेतस्थळावरुन एका महिलेची तब्बल 49 लाखाची फसवणूक करण्यात आली. विवाहाचे आणि व्यवसायाचे आमिष दाखवून गंडा महिलेला घालण्यात आला. याप्रकरणी 49 वर्षीय महिलेने फिर्याद दाखल केली आहे. त्यानूसार अज्ञात व्यक्तीविरुध्द विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायदा आणि फसवणूकीचा गुन्हा दाखल केला गेला आहे.
फिर्यादी 49 वर्षीय महिला एका नामांकित कंपनीत काम करते. ती घटस्फोटीत असून तीने विवाहासाठी तीचे प्रोफाईल जीवनसाथी डॉट कॉम आणी शादी डॉट कॉमवर टाकले होते. यावेळी एका विवाह संकेतस्थळावरुन तीच्याशी डेनीस जेम्स नावाच्या व्यक्तीने संपर्क साधत ओळख वाढवली. यानंतर तिला लग्नाचे आमिष दाखवले. तिच्याशी गोड बोलून तिला व्यवसायात गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणात फायदा करुन देण्याचे सांगण्यात आले.
आरोपीच्या गोड बोलण्यावर विश्वास ठेवत तिने त्याने सांगितल्यप्रमाणे ऑनलाईन पध्दतीने पैसे पाठवले. तीने 6/3/2019 ते 28/8/2019 दरम्यान तब्बल 49 लाख 15 हजार रुपये वर्ग केले. पैसे वर्ग केल्यानंतर तिने आरोपीशी संपर्क साधला असता , त्याने संपर्क टाळला. यानंतर तिचे फोनही उचलने बंद केले.