16 कोटीचे लोन देण्याच्या आमिषाने 32 लाखांची फसवणूक

पुणे :  एका कंपनीच्या भागीदारास 16 कोटीचे लोन देण्याच्या आमिषाने 32 लाखाला फसवण्यात आला. या प्रकरणी एका फायनांन्स कंपनीच्या नॅशनल हेडसह इतरांवर विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी निलेश उपासनी (रा.टिंगरेनगर,विश्रांतवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानूसार कंपनी वागळे इस्टेट, ठाणे या फायनान्स ऍन्ड इन्व्हेसमेंन्ट कंपनीचे नॅशनल हेड व इतर एक
जणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यातील फिर्यादी यांची भागीदारीमध्ये खासगी कंपनी असुन त्यावर कंपनीच्या नावाने केमिकल प्लान्टचे काम चालु केले. सदर प्लॅन्टचे बांधकामासाठी व मशिनरी यांचेसाठी वागळे इस्टेट,ठाणे या फायनान्स ऍन्ड इन्व्हेसमेंन्ट कंपनीचे नॅशनल हेड याने फिर्यादीस 16 कोटी रुपये कर्ज देण्याचे आमिष दाखवले. यानंतर फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून त्यांचेकडून 32 लाख 38 हजार रक्कम कर्जाचे मॉर्गेज ऍग्रीमेंन्टसाठी त्याचा इतर साथीदार याचे बॅंकेचे खात्यावर रक्कम भरण्यास सांगीतले.

त्यानंतर फिर्यादी यांना रजिस्ट्रेशनसाठी दुय्यम निबंधक कार्यालय,ठाणे येथे बोलविले असता आरोपी त्याचा फोन बंद करून रजिस्टेशनसाठी हजर न राहता ते त्याचे फायनान्स ऍन्ड इन्व्हेसमेंन्ट कंपनीचे ऑफीस बंद करून,काही न सांगता निघुन गेला. याप्रकरणाचा तपास एल.आर.सातपुते करत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.