बांधकाम व्यवसायीक पिता-पुत्राकडून कोटयावधीची फसवणूक

पुणे – बांधकाम व्यवसायीक फर्मकडून गुंतवणूकसाठी घेतलेली रक्कम इतरत्र वळवून कोटयावधीची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रफिक जाफरानी (62,रा.गुलटेकडी) आणि हसन रफीक जाफरानी (23) अशी आरोपींची नावे आहेत. यातील हसनला अटक करण्यात आली आहे. भारती विद्यापीठ परिसरात त्यांचा हेमी कन्ट्रक्शन आणि प्राईम प्रॉपर्टीज या नावाने व्यवसाय आहे. तसेची हेमी स्टीलयार्डही आहे. हिमांशू रमेश मेहता (43,रा.आदिनाथ सोसायटी, पुणे-सातारा रस्ता) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार फिर्यादीने आरोपींकडे फर्मच्या वापरासाठी 2013 पासून बॅंक व्यवहाराने व रोख स्वरुपात 4,22,00,000 रुपये दिले आहेत. त्याच्या बदल्यात एच.आर.जे.कंन्सट्रक्शन आणि हिल टाऊन कंन्ट्रक्शन या बांधकाम प्रोजेक्टमधील शो रुम देण्याचे कबुल करण्यात आले होते. त्याचे अलायमेंट लेटरही देण्यात आले होते. मात्र शोरुम देण्यात आले नाही.
दिलेली रक्कम व त्यावरील व्याजधरुन 5, 23, 12, 000 रुपयांची फसवणूक करण्यात आली. फिर्यादीने दिलेले पैसे त्यांनी व्यवसायात इतरत्र वापरले. तसेच इरुफान छागलानी यांनी 4,59, 50,000 रुपये, अल्ताफ जाफरानी यांचे 1,50,00000 रुपये, सैफुद्दीन त्रिवेदी यांचे चेकव्दारे 10,00000 रुपये व रोख स्वरुपात 68,00000 रुपये, झुल्फीकार रतलामवाला यांचे बॅंकेमार्फत 64,00000 व रोख स्वरुपात 21,00000 रुपये घेऊन आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. या गुन्हयाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कोळी करत आहेत.





